विविध कार्यक्रमाचे आयोजन
गडचिरोली। कै. श्रीमंत राजे सत्यवानराव महराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवार 17 जुलै 2015 ला विविध सामाजिक व लोकहितार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी मा. ना. श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महराज, आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री- गडचिरोली, मा. राजमाता राणी रुक्मीणीदेवी, जि. प. सदस्य तथा कुमार अवघेशराव बाबा उपस्थित राहणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे आहे
राजघाट, अहेरी मध्ये सकाळी 9 वाजता समाधी दर्शन तथा पुजन, रुक्मीणी मह्ल च्या प्रांगणात सकाळी 10 वाजता रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा, सकाळी 10:30 वाजता रक्दान शिबीर तथा रक्तदाब, रक्तशर्करा तपासणी, सकाळी 11 वाजता नेत्र तपासणी शिबीर (मोफत चष्मा वाटप), सकाळी 11:30 वाजता अपंग प्रमाणपत्र नोंदणी शिबीर, दुपारी 12:00 वाजता सर्जिकल बँक चे उद्घाटन, दुपारी 12:30 वाजता मोफत दुचाकी वाहन, चालक परवाना शिबीर आणि 1:00 वाजता येथील धर्मराव कृषी विद्यालय मध्ये अतिगरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक वाटप करण्यात येईल.
नागरिकांनी आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ ध्यावा असे आव्हाहन श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज स्मारक प्रतिष्ठाण, अहेरी तथा भारतीय जनता पार्टी व नाग विदर्भ आंदोलन समिती नगर ने केले आहे.