Published On : Mon, Jul 8th, 2019

शिवसैनिकांचा धडकला रामटेक बस स्टँड वर मोर्चा

रामटेक डेपोच्या नेहमीच्या विविध समस्यांनी वैतागले होते विद्यार्थी व प्रवाशी .

प्रवाश्यांच्या नेहमीच्या समस्यांकडे डेपो प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत .

रामटेक: रामटेक शिवसेना शहर च्या वतीने दि.८ जुलै ला रामटेक बसस्थानकातील विविध समस्या सोडविण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख धर्मेश भागलकर यांच्या नेतृत्वात अागर प्रमुख भोगे यांना निवेदन देण्यात आले.यात रामटेकवरुन नागपुर कडे जाणार्‍या बसेस तसेच येणार्‍या बसेसच्या वेळा पञकानुसार प्रवाशांच्या मागणीनूसार वेळापञक तयार करण्यात यावा.रामटेक बस आगारात १ ते २ अतिरीक्त बस उपलब्ध ठेवाव्या जेणेकरुन अतिरिक्त प्रवाशी,वृध्द,लहान मूलांना ञास होणार नाही.सायंकाळी ५ ते ७ वाजेच्या दरम्यान प्रवाशांची संख्या जास्त असते.

त्यात कार्यालयीन कर्मचारी,विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने असतात.परंतु प्रवाशांना बराच वेळ बस उपलब्ध होत नाही. रामटेक बस स्थानकावर विद्यार्थ्यांना बस पासेस करीता ञास तसेच सकाळी शाळेत जाण्याकरीता बस फेर्‍या कमी असणे अशा विविध समस्यांची माहीती मिळताच महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ छे अध्यक्ष माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी रामटेक बस स्थानकाला अाज दि.८ जुलै ला भेट दिली.याळेळी प्रत्यक्षात लहान लहान शाळकरी मुळे सकाळ पासून बस पासेस साठी उपाशी पोटी रांगेत उभी असतांना दिसून आले.

त्यांनी तात्काळ अागार प्रमुख भोगे यांना बोलावून वेगवेगळे पासेसचे तिन काऊॅटर लावण्यास सांगुन विद्यार्थ्यांच्या अडचण दुर केली. तसेच विद्यार्थी व प्रवाशी यांच्यासोबत चर्चा करुन वेळपञानुसार बसेच सुरू करण्याच्या सूचना अागारप्रमुख श्री. भोगे यांना देण्यात आल्या.याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख विवेक तुरक, शिवसेना शहर प्रमुख धर्मेश भागलकर ,युवासेना तालुका प्रमुख राजकुमार खोब्रागडे,शहर प्रमुख विश्वास पाटील,विद्यार्थी सेना प्रमुख हिमांशु पानतावने,शिवसेना उप – शहरप्रमुख पुरु मेश्राम, नगरसेवक सुमित कोठारी,माजी नगरसेवक सुनिल देवगडे,महेश बिसन,विनायक सावरकर,विलास तांदुळकर, राधेश्याम साखरे,बादल कुंभलकर,दिनेश माकडे,अनुप ठाकुर,राम धोपटे, अक्षय कावळे,विशाल पारधी,राहुल टोंगसे,रोशन चाफले,बालु वाढिभस्मे,योगेश दुधबर्वे , राहुल शर्मा,घनश्याम ठाकरे,बंडु मानकर, उमेश पापडकर, सह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.