| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jul 20th, 2018

  ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ची प्राथमिक फेरी आजपासून

  नागपूर : नागपूर महानगरपालिका व लकी इव्हेन्ट्स ॲण्ड म्युझिकल एंटरटेनमेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सेल इव्हेंटस्‌ सोल्यूशन्स ॲन्ड सर्विसेस यांच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भातील प्रतिभावंत गायक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

  स्पर्धेची महाअंतिम फेरी ४ ऑगस्टला होणार असून उद्या शनिवारपासून प्राथमिक फेरीला सुरूवात होणार आहे. उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृत भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शनिवार व रविवारी (ता. २२) १४ वर्षावरील व १४ वर्षाखालील वयोगटासह ज्येष्ठ गायक कलावंतांनाही प्राथमिक फेरीमध्ये सहभागी होता येणार आहे. प्राथमिक फेरीचे उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते होणार आहे.

  स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेत्या ठरणाऱ्या कलावंतांना २१,००० रुपये प्रथम, ११,००० रुपये द्वितीय व ७००० रुपये तृतीय असे रोख बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे.

  स्पर्धेच्या आयोजनासाठी मनपाच्या क्रीडा समिती सदस्यांसह लकी म्युझिकल ग्रुपचे संचालक लकी खान, विजय चिवंडे आदी सहकार्य करीत आहेत. स्पर्धेला मानव सुधार प्रन्यास संस्थेसह आदित्य-अनघा बँक आणि युनिक क्लिनिकच्या संचालिका डॉ. रिचा जैन यांचे सहकार्य लाभले आहे.

  सदर स्पर्धेत विदर्भातील उदयोन्मुख कलावंतांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी ८८८८८९९३२१, ९७६४०२६३६५ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145