Published On : Mon, Sep 9th, 2019

पार्सल बोगीतून २० लाखांचे कपडे लंपास

– ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला फटका , लोहमार्ग पोलिसात तक्रार

नागपूर: रेल्वेच्या पार्सल बोगीतून २७ पार्सलमधील २० लाख रुपये किंमतीच्या कपड्यांची चोरी झाली. पार्सल घेण्यासाठी ते नागपूर स्थानकावर आले असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान ही चोरी कुठे आणि कोणत्या मार्गावर झाली हा तपासाचा भाग आहे. या प्रकरणी पार्सल स्वीकारणाºया व्यावसायिकाने लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

गांजाखेत चौक, गांधीबाग येथील सुनिल भोजवानी (४६) यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांनी अहमदाबादवरून कपड्यांचे ४६ पार्सल मागविले होते. या पार्सलची रेल्वेत रितसर नोंदणी करण्यात आली त्यानंतर नागपुरसाठी रवाना झाली. नागपुरात पार्सल बोगी आल्यावर त्यातील १९ पार्सल व्यवस्थित मिळाले.

मात्र, २७ पार्सलमधील कपडे नागपुरात येण्यापुर्वी चोरी झाले आहेत. यात त्यांचे २० लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. रेल्वेने येणाºया पार्सलची चोरी होण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढले आहेत.

दोन महिन्यांपुर्वी एका नागरिकाने गुजरातहुन आंब्याच्या पेटी नागपुरात पाठविल्या होत्या. मात्र, नागपुरात गाडी येवूनही पेट्या उतरविण्यात आल्या नव्हत्या. एक दिवसानंतर परतीच्या प्रवासात नागपुरात गाडी आली असता त्यातील तीन पेट्या रिकाम्या तर दोन अगदीच खराब झाल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रशासन, आरपीएफने पार्सलच्या होत असलेल्या चोºया थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.