Published On : Sat, Apr 18th, 2020

आमदार आशिष जयस्वाल यांच्या खनिज विकास निधीतून राशन कार्ड व बँक खाते नसलेल्या मजूर वर्गाला जीवनावश्यक साहित्य वाटप.

रामटेक : रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत मनसर येथे १६ एप्रिल २०२० ला प्रतिक कास्टे तलाठी व जिवनलाल देशमुख ग्राम विकास अधिकारी*यांच्या हस्ते वाटप जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले

ग्राम पंचायत मनसर तर्फे अशा जवळपास ४५० कुटुंबाची यादी तयार करण्यात आली असून सदर यादी मा.उप विभागीय अधिकारी रामटेक,मा. गट विकास अधिकारी रामटेक,व मा. तहसीलदार रामटेक यांना सादर करण्यात आली असून त्यापैकी अत्यंत गरजू कुटूंबांना वाटप सुरु करण्यात आला आहे

आमदार अँड.आशिष जयस्वाल यांनी आलेल्या साहित्याची प्रत्येक्ष पाहणी करून गावातील प्रत्येक वंचित घटकाला लाभ मिळावा अशी सुचना ग्राम विकास अधिकारी व तलाठ्यांना केली त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य सतिश डोंगरे,पंचायत समिती सभापती कलाताई ठाकरे, ग्राम पंचायत मनसर च्या सरपंच योगेश्वरी हेमराज चोखांद्रे,उपसरपंच चंद्रपाल नगरे, ग्राम पंचायत सदस्य-सदस्या,ग्राम पंचायत कर्मचारी,पोलिस पाटील व गावातील सामाजिक कार्यकर्ते*उपस्थित होते.