Published On : Tue, May 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या मेडिकलमध्ये डॉक्टरांचा ‘फ्रिस्टाईल’ राडा ; सर्जरी-रेडिओलॉजी विभागात हाणामारी

रुग्णांसमोरच निवासी डॉक्टरांमध्ये हाणामारी; मेडिकल प्रशासनाने सुरू केली चौकशी
Advertisement

नागपूर : शासकीय मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सोमवारी उपचाराऐवजी निवासी डॉक्टरांचीच ‘फ्रिस्टाईल’ पाहायला मिळाली. सर्जरी आणि रेडिओलॉजी विभागातील कनिष्ठ निवासी डॉक्टरांमध्ये किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच धक्काबुक्की आणि ठोसेबाजीत बदलल्याने मेडिकल परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णांचे रिपोर्ट आणि एक्स-रे तपासण्यांमध्ये होत असलेल्या विलंबावरून रेडिओलॉजी विभागातील कनिष्ठ निवासी डॉक्टर क्षितिज यादव आणि सर्जरी विभागातील निवासी डॉक्टर वैभव चौधरी यांच्यात सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. “रिपोर्ट वेळेवर मिळत नाहीत,” या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि वातावरण चांगलेच तापले.

Gold Rate
June 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,800 /-
Gold 22 KT ₹ 1,33,400 /-
Silver/Kg ₹ 2,24,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वाद वाढताच सर्जरी विभागातील काही निवासी डॉक्टर थेट रेडिओलॉजी विभागात पोहोचले. सुरुवातीला चर्चा करण्यासाठी आल्याचे सांगण्यात आले, मात्र काही वेळातच दोन्ही गट आमनेसामने आले आणि जोरदार हाणामारी सुरू झाली. धक्काबुक्की, ठोसेबाजी आणि आरडाओरड यामुळे रेडिओलॉजी विभाग काही काळ रणांगणात बदलल्याचे चित्र होते.

या घटनेचा थेट परिणाम रुग्णसेवेवर झाला. क्ष-किरण तपासणीसाठी रांगेत उभे असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही काळ विभागाचे कामकाज ठप्प झाल्याने अनेक तपासण्या रखडल्या. “रुग्णांचे उपचार सोडून डॉक्टरच एकमेकांवर तुटून पडत असतील, तर विश्वास ठेवायचा कुणावर?” असा सवाल नातेवाईकांकडून उपस्थित करण्यात आला.

Advertisement

घटनेची गंभीर दखल घेत मेडिकल प्रशासनाने तातडीने चौकशी समिती स्थापन केली आहे. संबंधित निवासी डॉक्टर आणि विभागप्रमुखांची साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जात आहे.

दरम्यान, एवढा मोठा गोंधळ होऊनही अजनी पोलिस ठाण्यात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांनी, “या प्रकरणी कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही,” अशी माहिती दिली. त्यामुळे मेडिकल प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

नागपुर में आधी रात घर में घुसकर युवती से लूट #nagpurnews #crime #accusedarrested #newsupdate #news

नागपुर में आधी रात घर में घुसकर युवती से लूट #nagpurnews #crime...

मात्र 10 मिनट में 10 लाख के मोबाइल फोन चोरी कर हुआ फरार #nagpurnews #crime #stolen #mobile #news

मात्र 10 मिनट में 10 लाख के मोबाइल फोन चोरी कर हुआ...

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 27 JUNE 2026 #newsupdate  #maharashtranews #maharashtra #top #top10

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 27 JUNE 2026 #newsupdate...

नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews

नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews

नागपुर के प्रतापनगर में खड़ी दो गाड़ियों में लगाई आग #nagpurnews #NewsUpdate #Crime #LatestNews

नागपुर के प्रतापनगर में खड़ी दो गाड़ियों में लगाई आग #nagpurnews #NewsUpdate...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges