Published On : Fri, Jul 26th, 2019

कारगील विजय दिनानिमित्त कामठीतील सिनेमागृहात ‘उरी’चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण

Advertisement

कामठी: कारगिल विजय दिनाला 20 वर्षे पूर्ण झाले असून या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून युवकामध्ये देशाच्या सैन्याप्रति कर्तव्याची भावना आणि अभिमान वृद्धिंगत व्हावा यासाठी राज्यशासनाने मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात ‘ उरी-द सर्जिकल स्ट्राईक ‘या राष्ट्रप्रति अभिमान व्यक्त करणाऱ्या चित्रपटाचे चित्रपट गृहात मोफत प्रक्षेपण करण्याचे आदेश दिले यानुसार आज 26 जुलै ला कामठी येथील गोयल टॉकीज तसेच श्री टॉकीज मध्ये सकाळी 10 वाजता ‘उरो’चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण झाले ज्याचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोफत प्रक्षेपण चा लाभ घेतल्यानंतर विद्यार्थी टॉकीज च्या बाहेर पडताच त्यांच्यात एक वेगळाच उत्साह संचारला.

1999 मध्ये पाकिस्ताकडून घुसखोरी झाल्याची माहिती लष्कराला मिळाली. यानंतर भारताकडून पाकिस्तान विरोधात ही सैनिक कारवाही करण्यात आली.मे 1999 मध्ये सुरू झालेले कारगील युद्ध 77 दिवस चालले.नियंत्रण रेषेपलीकडे घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांनी सडेतोड प्रतिउत्तर देत 26 जुलै 1999 ला पाकिस्तानला या युद्धात हार पत्करायला लावली. तेव्हापासून कारगिल विजय दिवस हा संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो.

तसेच जम्मू काश्मीर मधल्या उरी येथील मुख्यालयावर 18 सप्टेंबर 2016 मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला.या हल्ल्यात 19 भारतीय जवाण शहिद झाले होते भारताने या हल्ल्याचा बदला घेतला यावर आधारित ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक ‘हा चित्रपट प्रदर्शित झाला असून भारतातील लष्कराच्या इतिहासातील हा पहिलाच सर्जिकल स्ट्राईक होता .देशरक्षण तसेच सैनिकांची देशाप्रती आणलेली भावना यथोचित या चित्रपटात मांडण्यात आली आहे .खऱ्या अर्थाने हा चित्रपट तरुणांच्याअ जीवनाला कलाटणी देणारा असल्याचे मत विद्यार्थ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधी समोर व्यक्त केले.

संदीप कांबळे कामठी