Published On : Fri, Apr 3rd, 2020

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत मिळणार मोफत तांदूळ

39 हजार 984 शिधापत्रिका धारकांच्या प्रति सदस्यांना प्रति माह 5 किलो तांदूळ मोफत मिळणार


कामठी :-राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढ होत असल्याने आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता प्राधान्य कुटुंब तसेच अंत्योदय शिधापत्रिका धारक लक्ष्यनिर्धारीत लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत 2 रूपये किलो गहू व 3 रुपये किलो तांदूळ या भावा प्रमाणे एप्रिल , मे व जून या तीन महिन्यांचा शिधा एकत्रितपणे उपलब्ध करण्याचे आदेश शासनाच्या अन्न व नागरी पूरवठा विभागाने केला होता मात्र परिस्थितीनुसार यामध्ये विचाराधीन केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार शिधपत्रिका धारकांना तीन महिन्याचे एकत्रित धान्य एकाच वेळी वितरित न करता दर महिन्याला वितरित करण्यात येणार आहे तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत प्रति सदस्य 5 किलो तांदूळ मोफत देण्याचे आदेशित केल्यानुसार कामठी तालुक्यातील 1 लक्ष 75 हजार 913 नागरिकांना 5 रुपये किलो प्रमाणे गहू तांदूळ दर महिन्याला मिळणार तसेच 39 हजार 984 शिधपत्रिकेवरील प्रत्येक सदस्यांना प्रतिमाह प्रमाणे 5 किलो तांदूळ हे दर महिन्याला मोफत मिळणार आहे.

केंद्र शासनाच्या आदेशांनव्ये देशातील कोरोना व्हायरस प्रदूर्भावाच्या पाश्वरभूमीवर शासनाने गरिबांना आधार देण्याच्या उदात्त हेतूने लागू केलेल्या योजनेनुसार कामठी तालुक्यातील अंत्योदय 7200 व प्राधान्य कुटुंबातील 32 हजार 784 शिधापत्रिका धारकांतील 1 लक्ष 75 हजार 913 नागरिकांना दर महिन्याला राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत 5 रुपये किलो भावाने दर महिन्याला एकत्रित धान्य मिळणार तसेच यानुसार अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिमाह अनुज्ञेय असलेल्या 5 रुपये किलो प्रमाणे नियमित 35 किलो अन्न धान्य वितरित करण्यात येणार आहे तसेच शिधपत्रिकेवरील प्रति सदस्य ला प्रति माह प्रमाणे 5 किलो तांदूळ हे मोफत मिळणार तसेच प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति सदस्य 5 किलो अन्न धान्य या परिणामात 5 रुपये किलो या भावाने धान्य मिळणार आहे तर प्राधान्य कुटुंब शिधा पत्रिका वरील प्रति सदस्य प्रतिमाह प्रमाणे 5 किलो तांदूळ हे मोफत मिळणार आहे या नियतन नुसार दर महिन्याला धान्य मिळणार आहे . गर्दीचे नियोजन व्हावे यासाठी स्वस्त धान्य दुकान दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे तेव्हा संयम बाळगून संचारबंदीचा मान राखून प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान पुरवठा निरीक्षक संदीप शिंदे यांनी केले आहे

तहसीलदार अरविंद हिंगे:-कोरोना व्हायरस चा प्रादुर्भावाणे निर्माण झालेल्या आपत्ती स्थितीत शासनाकडून प्राधान्य कुटुंब व अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मिळणारे तीन महिन्याचे एकत्रीत धान्य हे एकाच वेळी न मिळता दर महिन्याला 2 रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ या दराने मिळणार आहे तसेच शिधापत्रिकेवरील प्रति सदस्यांना पाच किलो तांदूळ हे मोफत मिळणार आहे मात्र शासनाकडून अजूनही मोफत तांदूळ पुरवठा करण्यात आला नसल्याने मोफत तांदूळ प्राप्त होताच त्वरित मोफत तांदूळ वितरित करण्यात येईल.


संदीप कांबळे कामठी