Published On : Sat, Jun 20th, 2020

जी प सदस्य व सरपंच मध्ये फ्री जुंपली फ्री स्टाईल

Advertisement

कामठी– खैरी गावातुन सुरादेवी ला जात असलेल्या नाल्यावरील पुलाला तोडल्या वरून जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ कंभाले यांनी ग्रामपंचायत ग्रामसेवक अशोक कुळमेथे यांना तुटलेल्या पुलाजवळ बोलावून तू पूल कसा तोडला?अशी विचारणा केली असता वेळीच सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे यांनी त्वरित घटनास्थळ गाठून तुम्हाला काय बोलायचे आहे तुम्ही माझ्याशी बोला यावर शाब्दिक चकमक वाढून सरपंच बंडू कापसे यांनी जी प सदस्य नाना कंभाले यांना मी या गावाचा सरपंच आहे तेव्हा मला न विचारता तू गावात आलाच कसा व हा पूल मी तोडला आहे अशा शाब्दिक वादातून दोघांनी संतापून एकमेकांच्या अंगावर धावून जात हा वाद शाब्दिक चकमकीसह हाणामारी पर्यंत पोहोचल्याने जी प सदस्य व सरपंच मध्ये फ्री स्टाईल झाल्याचे सांगण्यात येते .

दरम्यान उपस्थित असलेले माजी सरपंच व त्यांचा भाऊ सोबत ही वाद झाला.हा वाद जुनी कामठी पोलीस स्टेशन ला पोहोचताच कांग्रेस व भाजप चे पदाधिकारी व कार्यकर्ते पोहोचून राजकीय रंग वेधण्यात गुंतले यावेळी दोघांनी एकमेकाविरोधात पोलीस स्टेशन ला केलेल्या तक्रारीवरून गुन्हे नोंदविण्यात आले.

यानुसार फिर्यादी सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे यांनी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून आरोपी जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले वय 45 वर्षे रा कोराडी, खैरी ग्रा प चे माजी सरपंच किशोर धांडे वय 45 वर्षे, धर्मराज आदमणे वय 45 वर्षे त्यांचा भाऊ गुणवन्त आदमने वय 40 वर्षे व राम ठाकरे वय 33 वर्षे सर्व रा खैरी विरुद्ध भादवी कलम 323, 147, 149,294, 506 विरुद्ध गुन्हा नोंदविला तर जी प सदस्य नाना कंभाले यांनी दिलेल्या तक्रारी वरून आरोपी सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे रा खैरी विरुद्ध भादवी कलम 294, 506 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

बॉक्स:-या वादात सरपंच बंडू कापसे हे खाली पडून जख्मि झाल्याने त्यांच्या कमरेला चांगलीच जखम झाली होती यावेळी सरपंच बंडू कापसे यांना चाकु मारला अशी अफवा पसरल्याने भाजप च्या कार्यकर्त्याला कांग्रेस च्या लोकांनी चाकु मारला अशी अफवा पसरल्याने दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते जुनी कामठी पोलिस स्टेशन ला पोहोचले होते मात्र चाकु मारले नसून खोटी अफवा असल्याची माहिती निदर्शनास आल्याने सर्व प्रकरण शांत होऊन दोघांनी एकमेकविरोधात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला

संदीप कांबळे कामठी