Published On : Thu, May 24th, 2018

कामठी येथील निवासी शाळेत विनामूल्य प्रवेश

Admission Open
नागपूर: सामाजिक न्याय विभागांतर्गत कामठी तालुक्यातील वारेगाव येथील शासकीय अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रियासुरु करण्यात आली आहे. 2018-19 या शैक्षणिक सत्राकरिता वर्ग 6 ते 10 वी पर्यंत सेमी इंग्रजी माध्यमाकरिता विनामूल्य प्रवेश प्रक्रिया 1 एप्रिल पासून सुरु झाली आहे.

प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनामार्फत आवश्यक शैक्षणिक साहित्य व निवास व्यवस्था विनामूल्य करण्यात येते. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासंदर्भात शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर यांनी केले आहे.