Published On : Mon, Jun 16th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात एटीएममध्ये लोखंडी पट्टी लावून फसवणुकीचा प्रयत्न; सतर्कतेमुळे मोठा प्रकार टळला

Advertisement

नागपूर – वाडी टी पॉइंट येथील हिताची कंपनीच्या एटीएममध्ये एक धक्कादायक फसवणूक उघडकीस आली आहे. एटीएममधून पैसे काढणाऱ्या जागेवर काळ्या रंगाची, हूबहू मशीनसारखी दिसणारी लोखंडी पट्टी बसवून पैसे अडकवण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र, एका नागरिकाच्या सतर्कतेमुळे मोठी फसवणूक टळली आहे.

संजय नगरचे रहिवासी गुणरत्न प्रसाद डुकरे हे पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेले असता त्यांनी कार्ड स्वाइप करून प्रक्रिया पूर्ण केली. त्यांच्या मोबाईलवर पैसे डेबिट झाल्याचा मेसेजही आला आणि मशीनमधून नोटा मोजल्याचा आवाजही आला. मात्र पैसे बाहेर आले नाहीत. पैसे निघणाऱ्या स्लॉटमध्ये काहीही उघडं दिसत नव्हतं, त्यामुळे डुकरे यांना संशय आला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

थोडा वेळ थांबल्यानंतरही पैसे न मिळाल्यामुळे त्यांनी बाहेर येऊन परिसरातील लोकांना माहिती दिली. यानंतर पंचायत समितीचे माजी उपसभापती उमेश राजपूत आणि माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप साबळे यांनी एटीएममध्ये जाऊन पाहणी केली असता, त्यांनाही मशीनच्या नोट निघण्याच्या जागेवर एक वेगळी पट्टी बसवलेली आढळली.

तत्काळ याची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. गस्त घालत असलेली पोलिसांची टीम काही वेळातच घटनास्थळी पोहोचली. पोलिसांच्या उपस्थितीत ती पट्टी काढण्यात आली. ती इतकी सफाईदारपणे बसवण्यात आली होती की सामान्य व्यक्तीला ते लक्षात येणे कठीण होते.

सुदैवाने एटीएममध्ये टायमर सिस्टम असल्यामुळे पैसे पुन्हा मशीनमध्ये जमा झाले आणि ग्राहकाचा आर्थिक नुकसान टळले. या प्रकरणी डुकरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच परिसरातील सर्व एटीएमची सुरक्षा व्यवस्था तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement