Published On : Sat, Mar 14th, 2020

वाहन लुटणाऱ्या चार आरोपी दोन लाखांचा मुद्देमाल सह अटक

Advertisement

कन्हान : पोलिस स्टेशन कन्हान अंतर्गत कन्हान-तारसा मार्गाने जात असतांना फिर्यादी किशोर गिरीधरजी मंगळूकर ३० वर्ष रा.येरखेडा कामठी याला ८ मार्च रात्री ९.३० वाजता तीन अनोळखी इसमानि त्यांच्या दोन दुचाकीने येऊन फिर्यादीला चाकूने वार करून गंभीर जखमी करुन त्यांची ऍक्टिवा , मोबाईल व रोख ३००० रुपये जबरीने हिसकाऊन नेला. यातील फिर्यादी जखमी यांची प्रकृती सध्या गंभीर असून ते दवाखान्यात उपचार घेत आहेत.

नमूद गुन्ह्याचा गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण यांचेकडून समांतर तपास सुरु असताना, प्राप्त गोपनीय खात्रीशीर माहितिनुसार विधीसंघर्षग्रस्त बालक यांना पोलिस ठाणे कामठी, कन्हान व खापरखेडा येथील विविध ठिकाणावरुन कायदेशीररित्या ताब्यात घेण्यात आले. विचार पूस करून आरोपी नामे यश मुखेश महातो १९ वर्ष रा.कन्हान व नमूद गुन्ह्यातील इतर तीनही अल्पवयीन विधिसंघर्शग्रस्त बालक हे अल्पवयीन आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या जवळून गुन्ह्यात वापरण्यात आलेली ऍक्टिवा क्र एमएच ४० बीक्यू ०४९६ व हिरो होंडा एमएच ४० एझेड २१२३ सह एकूण २००,३००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेत.

सदर कार्यवाही एसपी ओला यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार यांचे आदेशाने सचिन मत्ते, सुरज परमार, सत्यशील कोठारे, शैलेश यादव, पोशि वीरेंद्र नरड, प्रणय बनाफ, सायबरचे पोशि सतिश राठोड व चालक एएसआई साहेबराव बहाळे यांचे पथकाने पुर्ण केली आहेत.