Published On : Sat, Jul 13th, 2019

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी च्या सचिव पदी माजी नगराध्यक्ष शकुर नागाणी यांची नियुक्ती

कामठी : -महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी चे सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांनी प्रांताध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानव्ये कामठी नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष व कांग्रेस चे वरिष्ठ पदाधिकारी हाजी अब्दुल शकुर नागानी यांची महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी च्या सचिव पदी नियुक्त करण्यात आली असून या नियुक्तीबद्दल नवनियुक्त शकुर नागानी यांनी अखिल भारतीय कांग्रेस कमिटी चे अध्यक्ष राहुल गांधी यांचे हात बळकट करणे तसेच पक्ष संघटन बळकटी साठी सदैव तत्पर असल्याचा विश्वास व्यक्त करीत प्रांताध्यक्ष अशोकराव चव्हाण, सरचिटनिस पृथ्वीराज साठे तसेच महासचिव सुरेश भोयर यासह अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या सचिव पदी हाजी अब्दुल शकुर नागाणी यांच्यावर सर्वस्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

संदीप कांबळे कामठी