Advertisement
नागपूर : शहरात अतिवृष्टीमुळे नागपुरात हाहाकार निर्माण झाला आहे.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यादरम्यान एसडीआरएफने बचावकार्य सुरू केले आहे.एसडीआरएफच्या २ तुकड्या ७ गटांत विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. आतापर्यंत १४२ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. मुक-बधीर विद्यालयातील ४१ विद्यार्थ्यांचा सामावेश आहे.
तर LAD कॉलेज हॉस्टेलचे ५० विद्यार्थिनी, वर्मा लेआऊट आणि समता लेआऊटचे २४ नागरीक, बर्डी मोर भवन येथून १४ प्रवासी, आणि पंचशील चौक येथून ११ जणांना रेस्क्यू करण्यात आले.एनडीआरएफ चमू सोबतच अग्निशमन दलसुद्धा मदत कार्यात आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन नागपूर महानगर पालिकेने केले आहे.