Advertisement
नागपूर: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५८ वर्धापन दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या केंद्रीय कार्यालयात महापौर नंदा जिचकार यांनी हस्ते ध्वजारोहण केले. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या यावेळी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, निगम सचिव हरिश दुबे, सहायक आयुक्त (साप्रवि) महेश धामेचा, मुख्य अभियंता मनोज तालेवार, प्रभारी अधीक्षक अभियंता संजय गायकवाड, सहायक संचालक (नगररचना) प्र.आ. गावंडे, कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर, प्रदीप राजगिरे, प्र. आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, डॉ. नरेंद्र बहिरवार, हिवताप अधिकारी जयश्री थोटे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, निगम अधीक्षक राजन काळे यांचेसह मनपा व अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.