Published On : Sun, Aug 16th, 2020

लिहीगाव येथे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Advertisement

कामठी :-, तालुक्यातील लिहिगाव ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर दहावी बोर्ड परीक्षेत 93 टक्के गुण घेऊन प्राविण्य प्राप्त यादीत प्रथम स्थान प्राप्त केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा सौरभ भगवान ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून गावात नव्या पर्वाला सुरुवात केले या नव्यापर्वाची गावकऱ्यांनी स्वागत केले

तालुक्यातील लिहीगाव ग्रामपंचायतचे सरपंच गणेश झोड यांनी ग्रामपंचायतच्या मासिक सभेत गावात प्रत्येक वर्षी दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत सर्वात जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होईल त्या विद्यार्थ्यांच्या हस्ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण करण्याचा ठराव एक मताने संमत करून निर्णय घेण्यात आला या ठरावाची अंमलबजावणी करीत स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर यावर्षी दहावी बोर्ड परीक्षेत लिहीगाव येथील अल्पभूधारक शेतकरी भगवान ठाकरे यांचा मुलगा सौरभ ठाकरे याने दहावी बोर्ड परीक्षेत 93 टक्के गुण घेऊन गावातून प्रथम येण्याचा मान मिळविला होता त्याच्या हस्ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर ग्रामपंचायत प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सरपंच गणेश झोड यांच्या हस्ते सौरभ व त्याचे वडील भगवान ठाकरे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला

कार्यक्रमाला उपसरपंच सुनिता बोरकर, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र ठाकरे, सुनीता ठाकरे, सुषमा ठाकरे ,सुनीता सोनटक्के ,रवी निकाळजे, रवींद्र बोरकर ,कृष्णराव ढेगरे ,माजी उपसरपंच जामुवत ठाकरे ,रवींद्र ठाकरे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व गावकऱ्यांनी कार्यक्रमादरम्यान तोंडाला मास्क बांधून व सोशल डिस्टंसिंग चा अंतर ठेवून कार्यक्रम साजरा केला ग्रामपंचायत ने सुरू केलेल्या या उपक्रमाने नवीन विद्यार्थ्यांना एक प्रेरणा देणारे उपक्रम असल्याचे सांगून गावकऱ्यांनी कौतुक केले

संदीप कांबळे कामठी