Published On : Thu, May 1st, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या कस्तुरचंद पार्कमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

नागपूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या स्मरणार्थ उपराजधानी नागपूर येथील कस्तुरचंद पार्कमध्ये आज भव्य शासकीय सोहळा पार पडला. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सोहळ्यास विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस दलाचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला पोलिसांकडून शिस्तबद्ध मानवंदना देण्यात आली. यानंतर आकर्षक आणि प्रभावी परेड सादर करण्यात आली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना अधिकच बळावली. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

Gold Rate
13 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,24,100/-
Gold 22 KT ₹ 1,15,400/-
Silver/Kg ₹ 1,80,700/-
Platinum ₹ 52,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमात आपल्या कार्यक्षमतेमुळे वेगळ्या ठसा उमठवणाऱ्या कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. त्यांच्या सेवेसाठी त्यांना प्रशस्तीपत्रे आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्र राज्याचा स्थापनेचा दिवस १ मे रोजी दरवर्षी साजरा केला जातो. १९६० साली भाषेच्या आधारे महाराष्ट्र व गुजरात या दोन स्वतंत्र राज्यांचा निर्माण करण्यात आला होता. नागपूरला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला होता.

Advertisement
Advertisement