मुंबई : महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपल्या १०० दिवसांच्या कार्यकाळातील यशस्वी कामगिरीचे रिपोर्ट कार्ड जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर ४८ विभागांचे मूल्यांकन आणि सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मंत्रालयांची यादी प्रसिद्ध केली असून, यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या अहवालात महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम, कृषी, ग्रामविकास आणि परिवहन व बंदरे या विभागांनी आघाडी घेतली असून, त्यांच्या कामगिरीचे टक्केवारी स्वरूपात मूल्यमापन करण्यात आले आहे.
सर्वोत्तम ठरलेले पाच विभाग व संबंधित मंत्री-
महिला व बालविकास विभाग – ८०% | मंत्री: आदिती तटकरे
सार्वजनिक बांधकाम विभाग – ७७.९५%
कृषी विभाग – ६६.१५% | मंत्री: माणिकराव कोकाटे
ग्रामविकास विभाग – ६३.८५%
परिवहन व बंदरे विभाग – ६१.२८%
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले की, एकूण ४८ विभागांपैकी १२ विभागांनी १००% उद्दिष्टे पूर्ण केली आहेत, तर १८ विभागांची कामगिरी ८०% पेक्षा अधिक आहे.
प्रशासकीय स्तरावरील सर्वोत्तम अधिकारी व त्यांची कामगिरी-
महापालिका आयुक्त:
उल्हासनगर – ८६.२९%
पिंपरी-चिंचवड – ८५.७१%
पनवेल व नवी मुंबई – ७९.४३%
पोलीस आयुक्त:
मीरा भाईंदर – ८४.५७%
ठाणे – ७६.५७%
मुंबई रेल्वे – ७३.१४%
विभागीय आयुक्त:
कोकण – ७५.४३%
नाशिक व नागपूर – ६२.२९%
पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक:
कोकण – ७८.८६%
नांदेड – ६१.१४%
राज्य सरकारच्या या अहवालामुळे प्रशासनातील कार्यक्षमतेवर प्रकाश पडला असून, अनेक अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचे कौतुक होत आहे.