Published On : Tue, Mar 2nd, 2021

कामठी शहरातील पाच खासगी रुग्णालय बनले कोरोना लसीकरण केंद्र

Advertisement

कामठी :-कामठी तालुक्यात मागील जानेवारी महिन्यापासून कोविड 19 लसीकरण मोहीम राबविली जात आहे तर कोरोना संक्रमणाला थांबविण्यासाठी कामठी शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आता संपूर्ण आळा घालण्याकरिता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत नोंदणीकृत असलेले कामठी शहरातील पाच खाजगी हॉस्पिटल ची कोरोनाच्या लसीकरण केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे ज्यामध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल, आशा हॉस्पिटल, प्रभात हॉस्पिटल, माहूरे हॉस्पिटल तसेच सिटी हॉस्पिटल चा समावेश आहे.या कोरोना लसीकरण केंद्रातून नक्कीच कोरोना संक्रमनाला रोखण्यात यश मिळेल.

फ्रंट लाईन कोरोना योद्धानंतर 60 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षे वयोगटातील इतर आजार असलेले अतिजोखमीचे रुग्ण यांचे लसीकरण कामठी च्या शासकीय रुग्णालयात 1मार्च पासून सुरू झाले असून 44 च्या जवळपास नागरिकांना कोविशिल्ड चे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे .तसेच शहरातील कोरोना लसिकरण केंद्रासाठी निवड करण्यात आलेल्या शहरातील 5 खाजगी रुग्णालयात प्रति व्यक्ती प्रतो डोज 250 रुपये प्रमाणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड 19 चे लसीकरण करण्यात येणार आहे.

Gold Rate
05 May 2025
Gold 24 KT 93,900/-
Gold 22 KT 87,300/-
Silver/Kg 95,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यामध्ये को-विन एप मध्ये नोंदणी झालेले हेल्थ केअर वर्कर,नोंदणी न झालेले फ्रँटलाईन वर्कर यामध्ये पोलीस विभाग, होमगार्ड, नगरपरिषद , तलाठी , तहसील व पंचायत समिती अधिकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे तसेच 60 वर्षे वरील सर्व वयोवृद्ध लाभार्थी व 45-59वर्षावरील लाभार्थी ज्यांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचने नुसार अन्य आजार असलेले लाभार्थी यांनी वैद्यकिय अधिकारो यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून कोविड 19 चे लसीकरण करायचे आहे.यासाठी लस घेनाऱ्या लाभार्थ्यांना कोविन -2.0 एप च्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी कारायची आहे.

लाभार्थ्यांनी शासनाच्या self registration.cowin.giv.inया संकेतस्थळावर नोंदणी करून त्यांना आपल्या पसंतीच्या वेळेवर व पसंतीच्या कोरोना लसीकरण केंद्रावर लस घेता येणार आहे.ही पद्धत अतिशय सोपी असून संबंधित व्यक्तीच्या घरातील इतर कोणीही ही प्रक्रिया पूर्ण आपल्या घरातील वयोवृद्ध किंवा 45 वर्ष पूर्ण असणाऱ्या कोमॉंबीर्ड व्यक्तीची नोंद उपरोक्त नमूद संकेतस्थळावर करू शकतो एक व्यक्ती रजिस्टर झाल्यावर इतर पात्र तिघांची नावे नोंद करू शकतो

अशी आहे नोंदणीची प्रक्रिया- ऑनलाइन स्वरूपात नोंदनोसाठी self registration.cowin.gov.in या संकेतस्थळावर गेल्यावर आपला विहित मोबाईल क्रमांक टाकावा त्यानंतर मोबाईल वर एक ओटीपी येईल तो टाकल्यावर आपला मोबाईल नोंदणीसाठी रजिस्टर होईल .पुढे ओळखपत्र क्रमांक ,नाव,लिंग, जन्म व साल टाकावे .ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पासवर्ड तसेच मोबाईल नंबर ने लॉग इन करून उपलब्ध लसीकरण दिनांक व केंद्राची निवड करावी लागेल .

कोरोना लसीकरण साठी आवश्यक कागदपत्रे-मोबाईल नंबर, आधार किंवा इतर विहित ओळखपत्र वय वर्ष 45 ते 59 मधील आजारी कोमो बीर्ड व्यक्तींना त्यांचे आरोग्य प्रमाणपत्र सादर करावे लागेल

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement