Published On : Sat, May 12th, 2018

जळगावमध्ये भीषण अपघात; ५ ठार

जळगाव: जळगाव-धुळे रस्त्यावर दळवेल गावाजवळ आज पहाटे चारच्या सुमारास कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले. हे सर्व पाचोरा येथील रहिवासी असून, ते लग्नसोहळा आटोपून घरी परतत होते.

पाचोरा येथील वाणी कुटुंब धुळ्याला लग्न समारंभासाठी गेले होते. समारंभ आटोपून ते कारमधून घरी परतत होते. पहाटे चारच्या सुमारास जळगाव-धुळे रस्त्यावर दळवेल गावाजवळ भरधाव ट्रकने कारला धडक दिली. या भीषण अपघातात पाच जण ठार झाले. तर पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जखमींना धुळ्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.