चंद्रपूर: गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरमध्ये गोळीबारीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मंगळवार 23 जुलै रोजी जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात गोळीबाराची घटना समोर आली आहे.
या गोळीबारात एका 28 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.शिवज्योतसिंग देवल असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
ही घटना राजुरा येथील आसीफाबाद मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्र समोरील जनरल स्टोर्स समोर घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार,सोमनाथपूर वॉर्ड निवासी मृतक शिवज्योतसिंग देवल हा आपल्या वडिलांना कर्नल चौक येथे भेटला. त्यानंतर तो आसीफाबाद मार्गाने जात असताना दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीने पाठलाग केला. दरम्यान, त्याने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी ओम जनरल स्टोर्स येथील शौचालयात प्रवेश केला. पण, आरोपीने समोरासमोर गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.