Published On : Mon, Sep 22nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

‘फायरिंग करा अन्..: भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या Live TV वर हिंसक वक्तव्य

दुबई- यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानला ६ विकेट्सने हरवले. २१ सप्टेंबर रोजी दुबईच्या मैदानावर झालेल्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानने पूर्ण दम दिला, पण भारताच्या फलंदाजांचा जोर अधिक होता. भारताने १७२ धावांचे लक्ष्य १८.५ ऒव्हर्समध्ये ४ विकेट्स गमावून पूर्ण केले. ही भारताची या स्पर्धेतील सलग चौथी विजय ठरली.
मैदानावरील नाट्यमय प्रसंग-

सामन्यात अनेक नाट्यमय घटना घडल्या. पाकिस्तानचा फलंदाज फखर जमान बाद झाल्यानंतर रागात मैदान सोडून गेला. त्यानंतर साहिबजादा फरहानने वादग्रस्त ‘गन सेलिब्रेशन’ केले, ज्यावर चाहत्यांनी त्यांचा तीव्र निषेध केला. भारताच्या रन चेसदरम्यान पाकिस्तानी गोलंदाजांनी अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला. ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानला ७ विकेट्सने पराभूत केलेले असल्यामुळे सुपर-4 मध्ये पाकिस्तान जिंकण्यासाठी संपूर्ण दांवपेंच लावत होता, पण अखेर भारताची विजय निश्चित झाली.

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पाकिस्तानच्या TV डिबेटमध्ये बेशर्मी-

सामन्यात भारताची विजय निश्चित झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये एका लाइव TV डिबेटमध्ये पॅनेलिस्टने खळबळजनक वक्तव्य केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत माजी पाकिस्तान क्रिकेटपटू उमर अकमल आणि बासित अली पॅनेलमध्ये दिसतात. पॅनेलिस्टने पाकिस्तान जिंकू शकणार का? असा प्रश्न विचारल्यावर तो म्हणतो:

मी तर म्हणेन फायरिंग करून सामना संपवावा, कारण नक्कीच आपण हरणार आहोत.”

या वक्तव्यामुळे प्रेक्षक संतप्त झाले. एका फॅनने ट्विटरवर म्हटले की, “पाकिस्तान सामना हरत असल्याने खुलेपणाने फायरिंग करून सामना संपवण्याची चर्चा करत आहेत. हीच पाकिस्तानची खरी मानसिकता आहे.”

भारताची सलग चौथा विजय-

हा भारताची आशिया कपमधील सलग चौथा विजय आहे. ग्रुप स्टेजमधील तीनही सामने भारताने जिंकले होते. या विजयाने भारत पॉइंट्स टेबलवर अव्वल स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत, त्यात २ जिंकले आणि २ हरले आहेत. पाकिस्तान आता २३ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध सामन्यासाठी उतरतो; या सामन्यात हरलेली टीम स्पर्धेतून बाहेर होईल.

Advertisement
Advertisement