नागपूर: महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी नागपूर महानगरपालिकेतर्फे आपत्कालिन प्रसंगी बचाव कार्य करणाऱ्या उत्कृष्ट अग्निशमन जवानांचा सत्कार करण्यात आला. मनपा मुख्यालयात आयोजित महाराष्ट्र दिन कार्यक्रमामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते जवानांना मनपाचा मानाचा दुपट्टा, सन्मानचिन्ह आणि संविधानाची उद्देशिका प्रदान करुन गौरविण्यात आले.
शहरातील विविध ठिकाणी आपत्कालिन आणि शहरातील विविध ठिकाणी अग्निशमनाचे बचावाचे उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या अग्निशमन विभागातील श्री. शालीकराम कोठे, श्री. प्रकाश कावडकर, श्री.भगवान वाघ, श्री.दिलीप चव्हाण, श्री.अर्सलान शेख, श्री. कपील पारवे, श्री. संदीप शिवणकर, श्री. मुरलीधर घारडे, श्री. शुभम गोनमारे, श्री. यश तराळे, श्री. धिरज उईके, श्री. विजय डेहनकर, श्री. आदित्य देशमुख, श्री. कार्तीक शहाणे, श्री. दिशांत पेंदाम, श्री. सतीश राहाटे, श्री. अनिकेत मेरखेड, श्री. गोविंदा मुंडे या अग्निशमन विभागातील जवानांना सन्मानित करण्यात आले.