Published On : Fri, Apr 13th, 2018

माटे चौक येथील रिलायन्स फ्रेशमध्ये आग

fire-brigade-nag
नागपूर: माटे चौक येथील रिलायन्स फ्रेशमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ०५ वाजून १७ मिनिटांनी आग लागली. अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग नियंत्रणात आली आहे.

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समजते. अचानक स्पार्किंग झाल्याने सर्वत्र धूर झाला होता. या घटनेत काही नुकसान झाल्याची सध्यातरी कुठलीही माहिती नाही.

मनपाच्या अग्निशमन विभागाचा नियंत्रण कक्ष व विभाग प्रमुख राजेंद्र उचके यांच्याद्वारे सदर माहिती देण्यात आली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement