औरंगाबाद: औरंगाबादच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आंबा अप्सरा चित्रपटगृहातील ‘नाईन डी’ या चित्रपटगृहाला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने अचानक रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण चित्रपट गृहाची राख रांगोळी झाली.
ही आग शॉटसर्किट मुळे लागल्याचे सांगितले जात असून यात चित्रपटगृहातल्या सर्व वस्तू आणि खुर्च्या कुशन कापड आणि फोमच्या असल्यामुळे आगीने तत्काळ पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. मात्र, तोपर्यंत चित्रपटगृह पूर्णपणे जळून खाक झाले होते. या घटनेत चित्रपटगृह मालकाचे अंदाजे १ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.