Published On : Fri, Sep 20th, 2019

अग्निशमन विभागाची सेवन-डे उच्च माध्यमिक शाळेत मॉक ड्रील

नागपूर : आपात्कालिन परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांनी सतर्क राहावे व त्यांना अशा परिस्थितीशी सामना करता यावा यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत सिव्‍हील लाईन्स येथील सेवन-डे माध्यमिक शाळा येथे नुकतेच फायर मॉक ड्रील व ईव्हॅकेशन ड्रीलचे आयोजन करण्यात आले.

आपातकालिन परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी, आपात्कालीन जिन्याने कसे बाहेर यावे याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रात्यक्षिक व कवायतींद्वारे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

मनपाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात ही मॉक ड्रील आयोजित करण्यात आली. यावेळी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सहा स्थानानिधाकारी केशव कोठे, संदीप शिवनकर यांनी मॉक ड्रीलच्या कवायतींचे आयोजन केले होते. यावेळी सेवन-डे माध्यमिक शाळेचे प्राचार्य संतोष अडसूड यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व २५० विद्यार्थी उपस्थित होते.