Published On : Mon, Jun 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे? मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; जय पवारांचे मोठे विधान

Advertisement

बारामती-राज्याच्या अर्थखात्याबाबत सुरू असलेल्या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी नवे वळण दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केला असून, लवकरच यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली.

बारामती येथे स्वर्गीय अजित पवार यांच्या सहकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता स्नेहमेळाव्यात जय पवार बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी जय पवार यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त करत, त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले. तसेच लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल बारामतीकरांचे आभारही त्यांनी मानले.

अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसल्यामुळे राज्यातील विकासकामे रखडली आहेत, अशी चर्चा सुरू असली तरी त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे जय पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखाते स्वतःकडे ठेवले होते, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी अर्थखात्याबाबत सविस्तर चर्चा झाली असून हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत याबाबत अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.

याच कार्यक्रमात जय पवार यांनी बारामतीमध्ये स्वर्गीय अजित पवार यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहितीही दिली. त्यांच्या या विधानानंतर राज्याचे अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार का, तसेच या खात्याची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.