
नागपूर -कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूच्या नशेत असलेल्या एका दाम्पत्याने महिला पोलिसांशी अरेरावी करत त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्रकार घडला. महिला पोलिसांची कॉलर पकडून धक्काबुक्की, शिवीगाळ, मारहाण आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर नागपूरचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गुन्हेगारांना स्पष्ट इशारा दिला आहे.
रविवारी मध्यरात्री नॉर्थ अंबाझरी रोडवरील पिकालो कॅफेसमोर एक दाम्पत्य रस्त्यावर गोंधळ घालत असल्याची माहिती पीटर मोबाईल पथकाला मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मोहम्मद नवीद परवेज उपाई आणि त्याची पत्नी खुशबू उपाई हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत आढळले.
पोलिसांनी त्यांना शांत करून पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर दोघांनी महिला पोलिसांशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. आरोपी महिलेने एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली आणि अश्लील भाषेचा वापर केल्याचा आरोप आहे.
पोलीस ठाण्यात नेल्यानंतरही त्यांचा गोंधळ सुरूच राहिला. पोलिसांना जीवे मारण्याची आणि गणवेश उतरवून घेण्याची धमकी देण्यात आली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या दुसऱ्या महिला पोलिसालाही आरोपी महिलेने थप्पड मारल्याची नोंद आहे.
दोघांची वैद्यकीय तपासणी केली असता ते मद्यधुंद असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण, शिवीगाळ, धमकी आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, सोमवारी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कठोर भूमिका स्पष्ट केली. “पोलीस कर्मचारी हे माझे कुटुंब आहे. त्यांच्यावर होणारा हल्ला म्हणजे माझ्यावर झालेला हल्लाच आहे. कायद्याच्या चौकटीत राहून अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
Chitaroli Nagpur : नागपुर के बप्पा आखिर बनते कहाँ हैं?
NEET विवाद पर युवाओं की राय, विशेषज्ञों से मंथन
RTO में रिश्वत का खेल बेनकाब! #NagpurNews #NagpurRTO #RTO #RTOScam #RTOCorruption #ACBRaid...
चुनाव आयोग बीजेपी का एजेंट, राऊत का गंभीर आरोप #maharashtranews #delhi #newsupdate...
दो बाइक की भीषण टक्कर! WCL कर्मचारी की मौत #Nagpur #RoadAccident #BikeAccident...
लॉज की आड़ में कथित देह व्यापार का खेल! नाबालिग समेत तीन...




