Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Apr 3rd, 2021

  अखेर कामठितील खाजगी रुग्णालय कोवीड केंद्रासमोर लागले शासनमान्य दरपत्रक

  खाजगी कोविड केंद्रातून होणारी आर्थिक लूट थांबणार

  कामठी:-कामठी शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोणाचा पादुर्भाव झाल्याने प्रत्येक दिवशी रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अनेक कोरोना रुग्ण खाजगी रुग्णालयात मोठ्याप्रमाणात उपचार घेत होते रुग्ण उपचारासाठी जाता बरोबर रुग्णाच्या नातेवाइकाकडून खाजगी रुग्णालयात ऍडव्हान्स पैसे जमा करून भरमसाठ आर्थिक लूट होत होती त्याची तक्रार कामठी येथील एम आई एम आई एम ,युवक कांग्रेस, भाजप , तसेच इतर 26 संघटनेकसह , खैरी ग्रा प चे सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे यांनी नुकतीच तहसीलदार अरविंद हिंगे यांना निवेदन देऊन खाजगी रुग्णालयातील आर्थिक लूट थांबविण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत तहसीलदार अरविंद हिंगे यांनी कामठी शहरातील सहाही खाजगी कोविड केंद्रावर शासनमान्य दर पत्रक लावून नागरिकांना दिलासा दिला आहे

  कामठी शहरातील सहा ही खाजगी कोविड केंद्रावर शासनाच्या वतीने लावण्यात आलेल्या शासनमान्य दरपत्रकात एका दिवशी कोरोना रुग्णावर पुढील प्रमाणे शासनाचे वतीने दर निश्चित करण्यात आले आहेत जनरल वार्ड विलगीकरण 4 हजार रुपये, आयसीयु विलगीकरन व्हेंटिलेटर वगळून 7500 रुपये , आयसीयू व्हेंटिलेटर सह विलगीकरण 9 हजार रुपये प्रति दिवसा करिता शासनाच्या वतीने निर्धारित करण्यात आले आहेत प्रत्येक दिवशीच्या शुल्कात दवाखान्याच्या वतीने रुग्णाची देखभाल ,रक्त ,लघवी तपासणी ,सोनोग्राफी ,एक्स-रे ,ईसीजी डॉक्टर्स ,परिचारिका यांचे तपासणी या सर्व बाबी समाविष्ट राहणार आहेत

  या व्यतिरिक्त औषधासाठी रुग्णांना वेगळे पैसे मोजावे लागणार आहेत खाजगी रुग्णालयातील रुग्णांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी अरविंद तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या मार्गदर्शनात विशेष तपासणी भरारी पथक तयार करण्यात आले आहेत खाजगी रुग्णालयात तीळ कोविड केंद्रात शासन मान्य दरपत्रक लागल्याने कोरोना रुग्णाची आर्थिक लूट थांबविण्यासाठी फार योग्य झाल्या बद्दल नागरिकांनी तहसीलदार अरविंद हिंगे सह प्रशासनाचे आभार मानले तसेच या न्यायिक मागनिसाठी शहरातील युवक कांग्रेस, एम।आई एम आई एम, भाजप तसेच इतर 26 सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत प्रशासनाला धारेवर घेत केलेल्या मागणीला यश मिळाल्याने उपरोक्त समस्त निवेदित संघटनांचा शहरवासीयांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे.

  संदीप कांबळे कामठी


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145