Published On : Thu, Mar 25th, 2021

‘ अखेर दोन्ही रेशन दुकानदारांवर कार्यवाही ‘ खापरखेडा व तामसवाड़ी रेशनचोरी प्रकरण

Advertisement

अमानत रक्कम जप्त , सक्त ताकीद

खापरखेडा :- कोरोना काळात रेशन चोरीच्या तक्रारसंबंधी अंतिम चौकशीत दोषी आढळल्याने खापरखेडा येथील सुरेश रामटेके व तामसवाड़ी येथील उमा गुजरमाळे या दोन्ही रेशन दुकानदारांवर जिल्हाधिकारी कार्यालय नागपुरच्या पुरवठा विभाग द्वारे झालेल्या कार्यवाही नुसार दोघांची अमानत रक्कम जप्त करण्यात आली आहे , सोबतच पुन्हा अश्या तक्रारी प्राप्त झाल्यास रेशनचा परवाना कायमचा रद्द करण्याची सक्त ताकीद सुद्धा दोघांना देण्यात आली आहे . जिल्हा पुरवठा अधिकारीच्या या कार्यवाहीमुळे सावनेर व पारशिवनी तालुक्यातील रेशनदूकानदारांचे धाबे दनानले आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ता शेखऱ कोलते यांना रेशन दुकानदारद्वारे कोरोना काळात रेशन चोरी करत असल्याच्या स्थानिक नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यावर कोलते यांनी पीड़ित ग्राहकांच्या तक्रारी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार, व अन्न पुरवठा मंत्रालयकड़ें पाठवून कार्यवाहिची मागणी केली होती. या प्रकरणाची दोन्ही तालुक्यातील पुरवठा अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांनी सखोल चौकशी करून अहवाल तहसीलदार मार्फ़त जिल्हा पुरवठा अधिकारीकड़ें पाठविला. या चौकशी अहवालमध्ये खापरखेडा येथील सुरेश रामटेके व तामसवाड़ी येथील उमा गुजरमाळे हे दोन्ही रेशन दुकानदार दि महाराष्ट्र शेड्यूल कमोडिटीज (रेगुलेशन ऑफ डिस्ट्रीब्यूशन ) रेगुलेशन 1975 च्या कलम 18 (2) नुसार दोषी आढळले असून त्यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालय नागपुरच्या पुरवठा विभाग द्वारे कलम 3 (2) नुसार कार्यवाही करत दोघांची संपूर्ण अमानत रक्कम जप्त करण्यात आली आहे , सोबतच पुन्हा अश्या तक्रारी प्राप्त झाल्यास रेशनचा परवाना कायमचा रद्द करण्याची सक्त ताकीद सुद्धा देण्यात आली आहे

चौकशी अहवालात रेशनचोरी उघड़
सावनेर व पारशिवनी तसिलदार मार्फ़त जिल्हा पुरवठा अधिकारीकड़ें पाठविन्यात आलेल्या चौकशी अहवालात खापरखेडा येथील रेशन दुकानदार सुरेश रामटेके हे ग्राहकांच्या शिधापत्रिकावर धान्य दिल्याच्या नोंदणी नसने, ग्राहकांना ई पॉश मशीनची पावती न देने , विक्री रजिस्टर प्रमाणित नसने, गहु व तांदूळचा साठा पुस्तकी साठ्यापेक्षा कमी आढळने , एका ग्राहकाला नऊ महिन्याचे रेशन न देने अश्या उलंघनात दोषी आढळले . सोबतच पारशिवनी तालुक्यातील महिलां रेशन दुकानदार उमा गुजरमाळे या दुकानाचे वेळ फलक बरोबर नसने, योजनेनिहाय लाभर्थ्यांची यादी दर्शनी भागावर न लावणे, स्वताच्या नावावर दुकान असून अन्य व्यक्तीला दुकान चालविन्यास देने, मृत व्यक्तीच्या नावे सुद्धा रेशन उचलने, नाम फलक ठराविक नमुन्यात नसने, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत प्राप्त नियतन वाटपामध्ये 2.67 क्विंटलची घट स्टॉकबुक मध्ये नोंद, एका ग्राहकाला तीन व्यक्तीचे रेशन कमी देवून पूर्ण व्यक्तिची पावती काढणे अश्या उलंघनात दोषी आढळले आहे.

अन्यथा परवाना कायमचा होईल रद्द…
कोलते यांच्या दोन्ही तक्रारी व दोन्ही तहसिलदारांचा चौकशी अहवालची गंभीर दक्षता घेवून नागपुरचे जिल्हा पुरवठा भास्कर तायड़े यांनी दोषी आढळलेल्या दोन्ही रेशन दुकांनदारांना संपूर्ण रेकॉर्ड सहित स्पष्टीकरण सादर करण्याची नोटिस बजावली . त्यावेळी दोन्ही रेशन दुकांनदार हे स्वताच्या बचावपक्षात समाधानकारक स्पष्टीकरण देवू शकले नाहीत . म्हणून तायड़े यांनी खापरखेडा येथील रेशन दुकानदार सुरेश रामटेके आणि पारशिवनी तालुक्यातील महिलां रेशन दुकानदार उमा गुजरमाळे यांना रेशनचोरी व अन्य नियमांचे उलंघनमध्ये दोषी धरुन त्यांच्यावर दि महाराष्ट्र शेड्यूल कमोडिटीज (रेगुलेशन ऑफ डिस्ट्रीब्यूशन ) रेगुलेशन 1975 नुसार कार्यवाही करीत दोघांची संपूर्ण अमानत रक्कम जप्त करण्याचे आदेश दिले . सोबतच दोघांना अंतिम संधी देण्यात आली असून भविष्यात अश्या प्रकारच्या दोषाची पुनरावृत्ती झाल्याचे आढळून आल्यास त्यांच्या रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, अशी सक्त ताकीद सुद्धा देण्यात आली आहे.

आपल्या हक्कासाठी तक्रार करने शिका..
मांहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे राज्य कार्याध्यक्ष शेखर कोलते यावर म्हणाले कि प्रत्येक दुकानदार हा सेवक असून नागरिक अर्थात ग्राहकांच्या सेवेसाठीच असतो. तो जर चोरी करत असेल तर त्याची त्वरित वरिस्ठ अधिकारी आणि पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करावी. ग्राहक तक्रार करीत नसल्याने अश्या चोरांचे खुपच फावते आणि ते शिरजोर होता. याचे रूपांतर नंतर मोठ्या भ्रस्टाचाराच्या प्रकरणात होते. अर्थात याला आपणच जवाबदार असतो. तक्रार केल्यावर कार्यवाहीमुळे अश्या अनेक चोराना धड़ा मिळाला आहे. म्हणुन आता प्रत्येक ग्राहकांनी जागृक होवून आपल्या हक्कासाठी तक्रार करने शिकलेच पाहिजे.