Published On : Thu, Jun 27th, 2019

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Advertisement

कामठी :-कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या कादरझेंडा येथील एका वादग्रस्त घराच्या बांधकाम प्रकरणात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या घरमालकला कामठी नगर परोषद च्या वतीने रीतसर नोटीस बजावून कामे थांबविण्याचे फर्मान सोडण्यात आले तद्नंतर मौखिक समुपदेशन करीत कामे थांबविण्याचे सांगण्यात आले मात्र सदर घरमालकाने नगर परिषद कडून आलेले नोटीस, दिलेले फर्मान ला न जुमानता स्वमर्जीने बांधकाम सतत सुरू ठेवून नगर परिषद च्या आदेशाची अवहेलना केल्याने नगर परिषद मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या आदेशानव्ये नगर परिषद च्या पथकाने त्वरित ते काम थांबवून त्यातील बांधकाम साहित्य जप्त करून त्या घरमालकावर जुनी कामठी पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंदविण्यात आला . या प्रकारची कारवाही झाल्याने शहरात चर्चेचा विषय ठरत असून नगर परिषद प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.

स्थानिक नगर परिषद हद्दीत येणाऱ्या कादर झेंडा येथील एका वादग्रस्त जागेवर पक्के बांधकाम सुरू असून हे बांधकाम दुसऱ्याच्या जागेवर होत असल्याने स्वहक्कांसाठी लढणारे तक्रारकर्ते रोहित अशोक जैस्वाल यांनी 27 मे 2019 ला कामठी नगर परिषद कडे माझ्या जागेवर अवैधेरित्या बांधकाम सुरू असून हे बांधकाम थांबविण्यात यावे अशी तक्रार केली होती यासंदर्भात नगर परिषद च्या वतीने सदर अनाधिकृत बांधकामाची मोका चौकशी करून हे काम थांबविण्यात यावे असे नोटीस घरमालकाला 31 मे ला देण्यात आले

तसेच मौखिक आदेश सुद्धा देण्यात आले मात्र हे बांधकाम निरंतर सुरू राहिल्याने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी गंभीर्याची भूमिका घेत दिलेल्या आदेशनव्ये नगर परिषद पथकाने त्वरित काल सायंकाळी 5 वाजता घटनास्थळी भेट देत अनधिकृत बांधकाम थांबविले.व बांधकाम साहित्य जप्त करीत प्रवेशद्वाराला नगर परिषद कारवाहीचे नोटीस लावण्यात आले तसेच मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या वतीने कनिष्ठ लिपिक प्रदीप भोकरे यांनी स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी नुसार आरोपी महिला (घरमालक) वर महाराष्ट्र राज्य नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 52, 53, 54 अनव्ये गुन्हा नोंदविण्यात आला.

या कारवाहिने इतर अनधिकृत बांधकाम धारकांचे धाबे दणाणले असून ही यशस्वी कारवाही मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनार्थ रचना सहाययक प्रज्योत काकडे, कनिष्ठ लिपिक प्रदीप भोकरे, स्वास्थ्य निरीक्षक विजय उर्फ गफ्फु मेथीयां आदींनी राबविली.

संदीप कांबळे कामठी