Published On : Fri, Aug 21st, 2020

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सेव्हन स्टार हॉस्पीटल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

Advertisement

मनपा प्रशासनाने नंदनवन पोलिसांत केली होती तक्रार


नागपूर : कोव्हिड काळात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये प्राप्त अधिकाराच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून नंदनवन पोलिसांनी जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पीटल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मनपा प्रशासनाने गुरुवारी (ता. २०) दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे भादंविच्या कलम १८८, २९० सह कलम आपत्ती व्यवस्थापन कायदा अधिनियम २००५ कलम ५१, ५८, सहकलम साथीचे रोग अधिनियम १८९७ कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोव्हिड अथवा नॉन कोव्हिड रुग्णांकडून शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार रुग्णांकडून रक्कम आकारावी लागते. यासंदर्भात शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. असे असताना सेव्हन स्टार रुग्णालयाने नॉन कोव्हिड रुग्णांकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत ६,८६,५२७ रुपये अधिकचे आकारले. शासनाच्या नियमांचे पालन खासगी रुग्णालये योग्य प्रकारे करतात की नाही यासाठी नागपूर महानगरपालिकेने अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले आहे. हे पथक कुठल्याही रुग्णालयास आकस्मिक भेट देऊन त्याची पाहणी व तपासणी करतात.

सेव्हन स्टार रुग्णालयात या पथकाला अनियमितता आढळली. शिवाय कागदपत्रांची पाहणी केली असता नॉन कोव्हिड रुग्णांकडून अधिकची रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाले. या आधारे संबंधित रुग्णालयाला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नोटीशीद्वारे जाब विचारला होता. मात्र, त्याचेही समाधानकारक उत्तर सेव्हन स्टार हॉस्पीटल व्यवस्थापनाकडून न मिळाल्याने आयुक्तांनी १८ ऑगस्ट रोजी एक आदेश काढला. रुग्णांकडून अतिरिक्त स्वरूपात आकारलेले ६,८६,५२७ रुपये तात्काळ परत देण्याचे आदेश याद्वारे सेव्हन स्टार हॉस्पीटलला देण्यात आले होते.

Advertisement
Advertisement
Advertisement