Published On : Fri, Aug 21st, 2020

नमस्कार करून चक्रधारी झाले लालपरीवर स्वार

– बस स्थानकावर वाढली वर्दळ ,प्रवाशांचा मात्र अल्प प्रतिसाद

MSRTC, ST Bus

नागपूर– परिवहन महामंडळातील कामगारांचे पोट असलेल्या लालपरीला चक्रधारींनी आधी नमस्कार केला, नंतरच लालपरीवर झाले स्वार. यानंतर वाहकाने तिकीट विचारायला सुरुवात केली. गणेशपेठ बसस्थानकाहून सकाळी ८ वाजता ८ प्रवाशांना घेऊन पहिली बस यवतमाळच्या दिशेने निघाली.
स्थानकाबाहेर अर्थात मुख्य मार्गावर बस आल्यानंतर प्रवाशांना आनंद झाला अन् चालक-वाहकांनाही दिलासा मिळाला. कारण पाच महिन्यांपासून बसेसची चाके थांबली होती. आर्थिक चणचण भासत होती. अर्धा पगार मिळत होता. आता लालपरी धावायला लागल्याने या समस्येतून नक्कीच सुटका मिळेल, अशी खात्री कामगारांना आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून परिवहन महामंडळाच्या बस स्थानकावर स्मशान शांतता होती. सणासुदीच्या दिवसात प्रचंड गर्दी असलेल्या बस स्थानकाने टाळेबंदीच्या काळात निरव शांतता अनुभवली. लालपरीला आता पुन्हा गतवैभव प्राप्त होत आहे. पहिला दिवस असल्याने आणि नागरिकांना माहिती नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही. एका बसला २२ प्रवाशांची परवानगी असली तरी ८ ते १० प्रवासी एका बसमध्ये दिसत होते. पुढे मार्गात प्रत्येक थांब्यावरून प्रवाशांची संख्या वाढत गेली. पाच महिन्यांपासून माहेर अन् सासरच्या प्रतीक्षेत असलेल्यांना लालपरीमुळे नक्कीच दिलासा मिळाला. गणेशपेठ मुख्य बस स्थानकावरून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीवरुन ९८ फेèयात ९१३ प्रवाशांनी प्रवास केला. टाळेबंदीच्या आधी गणेशपेठ आगारातून रोज जवळपास २०० गाड्या सुटायच्या.


बसमध्ये निजंर्तुकीकरण
राज्यशासनाकडून बुधवारी दुपारपर्यंत विभाग नियंत्रक कार्यालयात आदेश मिळाले. त्यांच्यामार्फत सर्व आगार प्रमुखांना सूचना देण्यात आल्या. त्यानुसार रात्रीपर्यंत सर्वच बसेस सज्ज ठेवण्यात आल्या. फेरीला जाणाèया बसची स्वच्छता तसेच निजंर्तुकीकरण करण्यात आले. आगाराच्या मुख्य प्रवेशव्दारावर प्रवाशांसाठी निजंर्तुकीकरणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती गणेशपेठ आगाराचे प्रमुख अनिल आमनेरकर यांनी दिली.

पहिल्याच दिवशी ४९ बस
नागपूर – अमरावती – ५, यवतमाळ -५, चंद्रपूर -४, भंडारा – ३, गोंदिया -३ आणि गडचिरोलीसाठी -२ बस रवाना करण्यात आल्या. अशा एकून २२ फेèया झाल्या. त्याच प्रमाणे नागपूर – रामटेक -४, नागपूर – काटोल-६, सावनेर – ७, उमरेड-४, पारशिवनी -२ मोहपा -१ कोंढाळी -३ अशा एकून २७ बस गुरुवारी प्रवाशांना घेवून निघाल्या. अशी माहिती विभाग नियंत्रण निलेश बेलसरे यांनी दिली.

गणेशपेठ आगारात शुक्रवारी १० फेरया
गणेशपेठ आगाराने २० फेèयांची व्यवस्था केली होती. त्यानुसार बस आणि कर्मचारीही सज्ज ठेवले होते. मात्र, प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने ४ बसेस सोडण्यात आल्या. हीच परिस्थिती विभागातील सर्व आगारांची होती. पहिल्या दिवसाचा प्रतिसाद लक्षात घेता गणेशपेठ आगाराने शुक्रवारसाठी १० फेèयांची व्यवस्था केली आहे. तसेच इतरही आगारांनी गुरुवारच्या प्रतिसादानुसार व्यवस्था केली आहे.