Published On : Wed, Oct 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

गरब्याच्या वेशात महिला पोलीस मैदानात; नागपुरात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा विशेष उपक्रम

Advertisement

गरब्याच्या वेशात महिला पोलीस मैदानात; नागपुरात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा विशेष उपक्रम

नागपूर : गरबा उत्सवाचा आनंद घेताना महिलांची सुरक्षितता आणि सन्मान कायम राहावा, यासाठी नागपूर शहर पोलिसांनी विशेष पुढाकार घेतला आहे. गरबा उत्सवात महिला पोलिसांनी गरब्याचा पारंपरिक वेश परिधान करून सहभागी होत परिसरावर लक्ष ठेवले. महिलांना गरबा खेळताना कोणताही त्रास होऊ नये आणि अनुचित प्रकार घडल्यास तातडीने हस्तक्षेप करता यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

गरबा उत्सवात मोठ्या संख्येने महिला आणि तरुणी सहभागी होत असतात. अशा वेळी त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नागपूर शहर पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्यांनी अनोखी जबाबदारी पार पाडली. गरब्याच्या वेशात उपस्थित राहून त्यांनी उत्सवातील घडामोडींवर लक्ष ठेवले. त्यामुळे कोणत्याही अनुचित प्रकाराला वेळीच आळा घालण्यास मदत होऊ शकते.

‘गरबा खेळण्याचा आनंद सर्वांना आहे; मात्र कोणाच्याही सन्मानाला ठेच पोहोचवण्याचा अधिकार कोणालाही नाही,’ असा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला आहे.

महिलांना निर्भय वातावरणात सण-उत्सवांचा आनंद घेता यावा, तसेच त्यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करता यावी, यासाठी पोलिसांनी हा उपक्रम राबवला. महिला सुरक्षा, सन्मान आणि विश्वास जपण्यासाठी नागपूर शहर पोलीस सदैव तत्पर असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.