Published On : Wed, Jul 1st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर शहर पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी-अंमलदारांचा सत्कार; नव्या पोलीस आयुक्तांची उपस्थिती

Advertisement

नागपूर : नागपूर शहर पोलीस दलात प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावून वयाची ५८ वर्षे पूर्ण केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. नागपूर येथील अलंकार सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

या सोहळ्यास नागपूर शहर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त होणारे अधिकारी व अंमलदार तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस दलासाठी दिलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि सेवा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक केले. सेवेनंतरचे आयुष्य निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. समाजात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी त्यांनी बजावलेल्या मोलाच्या सेवेबद्दल पोलीस दलातर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Advertisement

दीर्घकाळ एकत्र काम केलेल्या सहकाऱ्यांना निरोप देताना अनेक पोलीस अधिकारी व अंमलदारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ भावनिक झाले होते. उपस्थितांनी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली. या निरोप समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी मानव संसाधन विभाग तसेच पोलीस मुख्यालयातील अधिकारी व अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.