Published On : Fri, Aug 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

तुकाराम मुंढेंचा धडाका राज्यभर,पण नागपूरकरांच्या ताटात झुरळ, ब्लेड…FDA नेमकं करतंय तरी काय?

तक्रार आली तरच कारवाई, शहरातील अधिकाऱ्यांची तटस्थ भूमिका
Advertisement

नागपूर : राज्यभर अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य आस्थापनांविरोधात धडक कारवाईचा सपाटा लावला आहे. अस्वच्छता, निकृष्ट अन्न आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात असून अनेक ठिकाणी परवानेही निलंबित करण्यात आले आहेत.

मात्र नागपुरात वारंवार समोर येणाऱ्या धक्कादायक घटनांमुळे स्थानिक FDA यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील डाळीत झुरळ आढळल्याची घटना समोर आली, तर दुसऱ्या नामांकित हॉटेलमध्ये ग्राहकाच्या खाद्यपदार्थात ब्लेड आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला.तर आजच प्रसिद्ध फ्रेंच्यासीच्या चिकन मधे केस आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनांमुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Gold Rate
Sept 09,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,35,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या पार्श्वभूमीवर ‘नागपूर टुडे’ने नागपुरातील FDA अधिकाऱ्यांशी संपर्क साधून भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी “आमच्याकडे तक्रार आल्यानंतरच आम्ही कारवाई करतो,” असे उत्तर दिले.

मात्र यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनी तक्रार केल्यानंतरच FDA जागे होणार का? नियमित आणि अचानक तपासण्या करण्याची जबाबदारी स्थानिक यंत्रणेची नाही का? मोठ्या हॉटेल्समध्ये गंभीर त्रुटी घडूनही त्या आधी का उघड होत नाहीत? नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोणाची?

Advertisement

राज्यभर तुकाराम मुंढे कठोर कारवाई करत असताना नागपुरातील स्थानिक FDA अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचाही आढावा घेतला जाणार का? वारंवार घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का? निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार का, असा प्रश्न आता नागपूरकर विचारत आहेत.

अन्नसुरक्षा ही केवळ तक्रारींवर अवलंबून राहणारी यंत्रणा नसून ती प्रतिबंधात्मक तपासणी, नियमित निरीक्षण आणि कठोर अंमलबजावणीवर उभी असते. त्यामुळे नागपुरातील FDA यंत्रणा अधिक सक्रिय होणार की तक्रारींचीच वाट पाहत बसणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.