Published On : Sat, May 11th, 2019

मुला व सुनानी शेती व प्रॉपर्टी च्या हिस्सा करिता वडिलांना मारहाण

कन्हान: पोलीस स्टेशन अंतर्गत वेको लि इंदर कॉलरी नं.६ येथील मानसिंग राजपुत्र हयाना त्याचे दोन मुल व सुनानी शेती व प्रॉपर्टी च्या हिस्सा करिता जबर मारहाण करून जखमी केले.

वेकोलि इंदर कॉलरी नं ६ येथील सेवा निवृत्त रहिवासी मानसिंग रामनारायण सिंग राजपुत वय ७० वर्ष हयाना १ मे ला सकाळी १०.३० वाजता दरम्यान त्यांच्या दोन मुले व दोन सुनानी शेती व प्रॉपर्टीचा हिस्सा पाहिजे या कारणावरून संगनमत करून वडील मानसिंग राजपुत यास आरोपी १) मुलगा रामप्रताप सिंग मानसिंग राजपुत याने वडिलांना फ्रिज वर ढक्कल ढुक्कल करून आरोपी २) सुन ज्योती रामप्रताप राजपूत हिने डाव्या खांद्यावर लाकडी दंडा मारून फँक्चर केले आणि आरोपी ३) रज्जन सिंग मानसिंग राजपुत व ४) रूब्बी रंज्जनसिंग राजपुत हयानी जिवे मारण्याची धमकी दिली. यातील सर्व १ ते ४ आरोपी इंदर कॉलरी नं ६ येथील रहिवासी असुन फिर्यादी मानसिंग राजपुत यांचे मुले व सुना असुन फिर्यादी च्या तोंडी रिपोर्ट व डॉक्टर रिपोर्ट वरून कन्हान पोलीसांनी बुधवार (दि ८) ला रात्री ९ वाजता आरोपी १ ते ४ विरूध्द कलम ३२५, ५०६, ३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास स फौ गुलाबसिंग ठाकुर करित आहे.

– मोतीराम रहाटे