Published On : Sat, May 11th, 2019

शेतातील आणखी दोन खांबाच्या विधृत ताराची चोरी

विधृत ताराची आठवी वेळा ४० हजार रू असे एकुण ४ लाख २४ हजाराची चोरी

कन्हान: पिपरी, टेकाडी मौजा येथील शेतातील एका आठवडयात तिनंदा विधृत खांद्यावरील जिवंत अँल्युमिनि यम विधृत ताराची चोरी त्या नंतर सुध्दा विधृत महामंडळ व पोलीस प्रशासन यांच्या निष्काळजी पणाने जिवंत विधृत तार चोरांनी रात्रीजो सपाटा लावुन विधृत महावितरण कंपनीचे ४ लाख २४ हजार रुपयांचे भारी नुकसान होऊन शेतकऱ्या ला सुध्दा भयंकर फटका बसविल्याने एखाद्या शेतकऱ्यानी आत्महत्या केल्या वरच विधृत कंपनी व पोलीस प्रशासन जागे होईल का ? अश्या प्रश्नाच्या चर्चेला परिसरात उत येत आहे.

कन्हान पोलीस स्टेशन पासुन पश्चिमे ला २ ते ३ कि.मी. लांब पिपरी गाडेघाट रोड कडील पिपरी, टेकाडी मौजाच्या शेतकऱ्याच्या शेतीकरिता असलेल्या विधृत लाईन भाऊराव वरफडे यांच्या शेतातील गुरुवार (दि.९) रात्री दोन खांबा वरील जिवंत विधृत तारा अंदाजे किंमत ४० रूपयांची चोरून नेली. या अगोदर १) खंडाळा (निलज) शेतातील दि.१७/ ०४/१७ ला सात खांबाची किं ९६७८७ रूपयांचे विधृत तार चोरी, २) राणी बगी चा पिपरी दि १५/०६/१८ ला १ लाख ७० हजार रुपयांची ३) पिंपरी भोस्कर च्या शेतातील दि.०९/१०/१८ ला पाच खांबाची किं.७७२७१ रूपये ४) पिपरी श्रीराम कोरवते च्या शेतातील तीन खांबा ची किमत ४० हजार रुपये ५) रविवार (दि.१४) एप्रिल च्या रात्री विधृत सिमेंट खंबा तोडुन पाच विधृत खांबाची अल्य मिनिअम जिवंत तारा किं ९१४४० रूपये त्या सामोरील अखाडु ठाकरे च्या शेताती ल ६) गुरुवार (दि.१८) एप्रिल ला रात्री तीन खांबाची ५० हजार रुपयांची विधृत तारा चोरी ७) रविवार (दि .२२) ला रात्री वेकोलि कर्मचारी गँस गोडाऊन च्या मागील गोलवानी यांच्या शेतातील पाच विधृत खांबाची विधृत तारा किंमत ९० हजार रुपयांची चोरून नेली. अश्या प्रकारे आ़ठ वेळा ४ लाख २४ हजार रूपयांचा अँल्युमिनियमची विधृत तार चोरीची महावितरण कंपनी कन्हान चे सहाय्यक अभियंता ओमकार यांनी कन्हान पोलीस स्टेशनला वेळोवेळी तक्रार दाखल करण्यात आली होती. कन्हान परिसरात आ़ठ वेळा विधृत खांबावरील जिवंत विघृत तार चोरी करणारे चोर पकडण्यात कन्हान पोलीसांना अद्याप यश मिळाले नसल्याने विधृत तार चोरी करण्या-यांचे मनोबल वाढुन चोरांनी विधृत तार चोरीचा धुमाकूळ घालत तार चोरीचा सपाटा लावला आहे.या विधृत तार चोरी मुळे विधृत खंडीत होऊन शेती करणारे, भाजीपाला पिकविणा-या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्या ला व विधृत कंपनीला नुकसान सहन करावे लागते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अखत्यारित उर्जा खाते संबंधित महावितरण कंपनी व शेतकऱ्याच्या शेती करिता विधृत पुरवठा करण्या-या विधृत खांबाची लाखोची तारे चोर लंपास करित आहे. परंतु पोलीसां चा फक्‍त तपासच सुरू असेल तर या मुळे गंभीर अडचणीत सापडलेल्या एखाद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या वरच प्रशासन जागे होईल का ? असा संतप्त प्रश्न शेतकऱी, नागरिक व्यकत करित आहे.

कन्हान पोलीस स्टेशनचे थानेदार चंद्रकांत काळे यांच्या कार्यकाळात अवैध धंद्याना सुगीचे दिवस आले असुन विधृत तार चोरी, कार चाके चोरीच्या मोठय़ा प्रमाणात घटना होऊन अद्याप चोरांना पकडण्यास पोलीस अपयशी ठरत आहे. यास्तव कन्हान पोलीसांनी नागरिकांचा विश्वास गमाविल्याने संबंधि त उच्च अधिका-यांनी योग्य कार्यवाही करून चोरांना पकडुन विधृत तार चोरी वर, कार चाके चोरी, दुचाकी वाहन चोरी, कोळशा, रेती, मॅग्निज दगड व ईतर चोरी चा न्याय निवाडा लावुन अंकुश लावण्या ची मागणी परिसरातील नागरिक, शेतकरी हयानी केली आहे.

– मोतीराम रहाटे