Published On : Tue, Nov 26th, 2019

दिव्यांगाचे उपोषण यशस्वी, निधी वाटप कार्यवाई सुरू

Advertisement

दोन वर्षांचा निधी दिव्यांगाच्या खात्यात जमा होणार.

कन्हान : – नगरपरिषद कन्हान-पिपरी व्दारे दिव्यांगाच्या समस्या सोडविण्या साठी वारंवार निवेदनाने मागणी केली. मोर्चा, ठिय्या आंदोलन केले तरी सुध्दा अद्याप ३% निधी वाटप करून समस्या सोडविण्यात न आल्याने प्रहार दिव्यांग/अपंग क्रांती मोर्चा कन्हान तर्फे नगर परिषदे समोर दिव्यांग बांधवाच्या आमरण उपोषण कत्यांना मुख्याधिकारी हयानी पत्र व धनादेश देत निधी वाटप कार्यवाही सुर केल्याने उपोषणाला यश मिळाले.

प्रहार दिव्यांग/अपंग क्रांती मोर्चा कन्हान तर्फे नगरपरिषद कन्हान-पिपरी ने दिव्यांग लोकांचे २०१४ ते २०१९ पर्यंत चे शासन निर्णय २८ ऑक्टोबर २०१५ शासन निर्णय क्रमांक संकीर्ण – २०१५/प्र, क्र.११८/नवी-२० नुसार व शासन निर्णय प्र, क्र.१४६/१९९५ च्या कलम ४० अन्यवे ३% निधी व नवीन नियमा नुसार कन्हान शहरातील नगर परिषद हद्दीतील दिव्यांग लोकांना ५% निधी नगरपरिषदने वाटप न केल्याने कन्हान नगर परिषद समोर प्रहारचे जिल्हा प्रमुख रमेश कारेमोरे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सोमवार दि.२५ नोव्हेंबर २०१९ ला सकाळी ११ वाजता सुरु करण्यात आले.

यांची दखल घेत मुख्याधिकारी सतिश गांवडे हयानी सायं ५ वाजता उपोषण स्थळी दिव्यांगा ना भेटुन सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाचा निधी मंजुर करून दिव्यांगाच्या खात्यात जमा करण्याचा धनादेश बँकेत जमा करून निधी वाटप कार्यवाही सुर करण्यात आली आहे व मागील वर्षाचा निधी बाबत ठराव मंजुर करण्यात आले असुन येणा-या २०२०- २१ वर्षात देण्यात येण्याची तरतुद करण्यात येणार आहे करिता उपोषण सोडुन नगरपरिषदे ला सहकार्य करण्या चे आश्वासन पत्र दिल्याने दिव्यांगाच्या आमरण उपोषण यशस्वी झाल्याचा आंनद व्यकत करण्यात आला.

याप्रसंगी प्रहार संघटना नागपुर जिल्हा अध्यक्ष रमेश कारेमोरे, महेंद्र भुरे, नरेश हिंगे, प्रविण गोडे,दिव्यांग प्रविण शेंडे, योगेश पात्रे, सागर फरकाडे, प्रवीण माने, अश्विन भिवगडे, सुभाष मेश्राम, राजु राऊत, जयवंत थोरात, राजेश्वरी ओडियार, पिंकी श्रीवास्तव, वनिता मेश्राम, रंगराव ठाकरे, योगेश धावडे, नवनाथ शेंडे, बबन पटेल, विक्की पुरवले, मंगेश नितनवरे, जयेश रामटेके आदी सह मान्यवर नागरिक उपस्थित होते.