Advertisement
कन्हान : – येथील दिव्यांच्या समस्या त्वरीत सोडविण्याकरिता प्रहार संघटना नागपुर जिल्हा अध्यक्ष रमेश कारेमोरे यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेल्या दिव्यांगाच्या आमरण उपोषण आंदोलन स्थळी कन्हान कांन्द्री दुकानदार महासंघ पदाधिकारी भेट देऊन समस्या जाणुन घेत महासंघा व्दारे आंदोलनास जाहीर समर्थन करून पत्र दिले.
तसेच नागपूर जिल्हाधिकारी, कन्हान-पिपरी नगर परीषद मुख्याधिकारी यांना लेखी पत्र पाठवुन दिव्यांगाच्या न्यायीक मागणी ला समर्थन व जाहीर पाठींबा घोषित केला. याप्रसंगी दुकानदार महासंघाचे अध्यक्ष शेख अकरम कुरैशी, प्रशांत बाजीराव मसार , दिपक तिवाडे, सचिन गजभिए, शिवशंकर हलमारे, ज्ञानेश्वर राजुरकर, राजेश गजभिए, नामदेव तडस, संजय विश्वकर्मा, अविनाश हातागडे, मुकेश गंगराज आदी प्रामुख्याने उपस्थित होते.