Published On : Sat, Oct 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

FASTagच्या नावाखाली खात्यातून पैसे कट? 17 लाखांहून अधिक व्यवहारांमध्ये गडबड!

Advertisement

FASTagच्या नावाखाली खात्यातून पैसे कट? 17 लाखांहून अधिक व्यवहारांमध्ये गडबड!

नागपूर : FASTagमुळे टोलनाक्यावरचा वेळ वाचतो, टोल भरण्याची प्रक्रियाही काही सेकंदांत पूर्ण होते. मात्र, याच FASTag व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर चुकीच्या शुल्ककपातीची प्रकरणे समोर आली आहेत. 2025 मध्ये देशभरातील 17 लाख 66 हजार व्यवहारांमध्ये वाहनचालकांकडून चुकीचे टोल शुल्क आकारले गेले.

एका वर्षात FASTagद्वारे तब्बल 646 कोटी व्यवहार झाले. त्यापैकी चुकीच्या शुल्ककपातीचे प्रमाण 0.03 टक्के असले, तरी लाखो व्यवहारांमध्ये वाहनचालकांच्या खात्यातून चुकीची रक्कम वजा झाल्याने डिजिटल टोल व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

तक्रार केली तरच मिळतो परतावा-
FASTagमधून चुकीची रक्कम वजा झाल्याचे आढळल्यास वाहनचालकाला संबंधित व्यवहाराची तक्रार करावी लागते. तपासणीत शुल्क चुकीचे आकारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बँकेमार्फत रक्कम परत केली जाते.त्यामुळे FASTag वापरणाऱ्या वाहनचालकांनी आपल्या खात्यातील व्यवहार नियमित तपासणे आणि संशयास्पद कपात आढळल्यास तातडीने तक्रार करणे गरजेचे आहे.

मग यंत्रणा करतेय काय?
FASTagच्या इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन व्यवस्थेवर टोल मॉनिटरिंग अँड कंट्रोल सेंटरकडून देखरेख ठेवली जाते. बँका, सिस्टिम इंटिग्रेटर्स आणि टोल वसुली करणाऱ्या संस्थांमध्ये समन्वयाची व्यवस्थाही आहे.मात्र, एवढी यंत्रणा असतानाही 17 लाखांहून अधिक व्यवहारांमध्ये चुकीची कपात कशी झाली? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. डिजिटल टोल प्रणाली अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी अशा चुका रोखण्याची गरज निर्माण झाली आहे.FASTag लावा, पण खात्यातून किती पैसे कट झाले यावरही लक्ष ठेवा!

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.