Published On : Sat, Aug 17th, 2019

मौदा- माथणी टोलनाका बंद करावा नितीन गडकरी यांना या आशयाच्या मागणीचे आमधरे यांनी दिले निवेदन

कामठी : नागपूर भंडारा रोड वरील मौजा माथणी येथील टोलनाका हटविण्यात यावा या आशयाचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समिती कामठी चे सभापती हुकुमचंद आमधरे यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना सादर केले निवेदनानुसार कामठी शहर हे तालुक्याच्या स्थळ असून येथे तहसील कार्यालय प स कार्यालय न्यायालय दोन पोलीस स्टेशन ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय निमशासकीय कार्यालय तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना उपयोगी पडणारे सोईयुक्त कार्यालय कामठी शहरात आहे मात्र येथील उपविभागीय कार्यालय मौदा येथे स्थानांतरित झाल्यामुळे या कार्यालयाशी संबंधित कामा करिता विद्यार्थी शेतकरी व्यापाऱ्यांना मौदा येथे कार्यालयात ये-जा करावी लागते मौदा येथे विधानसभा निवडणुकीशी संबंधित कामे केली जातात शिवाय मौदा येथे महानुभाव पंथी परमात्मा एक धर्माचे प्रसिद्ध आश्रम आहेत तसेच मौदा येथे दीपावर अस्ति कलश विसर्जन तिसरा दिवस दहावा दिवस चे कार्य केले जाते त्याकरिता येथे भंडारा कामठी कुही रामटेक तालुक्यातील अनेक लोक रेल्वे बसची पर्याप्त व्यवस्था नसल्यामुळे दररोज खाजगी किंवा भाड्याच्या वाहनांनी आपल्या आप्तियाना घेऊन जात येत असतात त्यांना या टोल नाका चा फार मोठा फटका बसत आहे त्याकरता शासनाने 15 ऑगस्ट 2019 पर्यंत हा टोलनाका न हटविल्यासतीव्र आंदोलन करण्याचा इशारा हुकुमचंद आमधरे यांनी व ग्रामस्थांनी दिला होता त्या अनुषंगाने 14 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे त्यानुसार 16 ऑगस्टपासून जाहीर केलेले आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची माहिती संयोजक हुकुमचंद आमधरे यांनी दिली