कामठी :-महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या सौजन्याने शेतकरी सक्षमीकरणाचा प्रकल्प म्हणून ई पिक पाहणी पथदर्शी प्रकल्प संपूर्ण राज्यात रांबविण्यात येत आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे आदेश 10 मे 2018 नुसार आणि महसूल व वन विभागाचा शासन निर्णय नुसार महाराष्ट्रातील सहा तालुक्यात या पथदर्शी प्रकल्पाचे माहे मार्च 2019 पासून राबविण्यास सुरुवात झाली असून खरीप हंगाम 2019 पासून शेतकरी नोंदणी तसेच पिकाची माहिती या ऐप वर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामध्ये नागपूर विभागातून कामठी तालुक्याचा समावेश आहे.तेव्हा या इ पीक पाहणी मोबाईल ऐप बाबत आज कामठी पंचायत समिती सभागृहात समस्त तलाठी, कृषी अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.तसेच ई-पीक पाहणी मोबाईल ऐप द्वारे शेतकऱ्यांनो पिकाची सात बारावर नोंदी करा असे आव्हान तहसिलदार अरविंद हिंगे यांनी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात व्यक्त केले.
याप्रसंगी या ई पीक पाहणी मोबाईल ऐप द्वारे शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाची आणि पिकांच्या स्थितीची नोंद तलाठी कार्यालयात ठेवली जाते .यात जीपीएस प्रणालीचा वापर करून फोटो संबंधित पिकांचे छायाचित्र मोबाईल अँपवर डाउनलोड करून त्यावर पिकाच्या नोंदी करू शकतो.तसेच शेतकरी हे ऐप डाउनलोड करून स्वता शेतकरी हे ऐप डाउनलोड करून त्यावर पिकाच्या नोंदी करू शकतो .शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पीक पेरणी नोंदीचा दाखला आवश्यक असतो .पिकांची नोंदणी करण्यासाठी या ऐप ची शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे .
नागपूर जिल्ह्यातून एकमेव कामठी तालुक्याचा ई पीक पाहणी मोबाईल ऐप साठी निवड करण्यात आली असून यापुढे भविष्यात होणारा हवामानाचा अंदाज, पीक विमा, कीड रोग इत्यादी अनेक बाबींचा या ई पीक पाहणी मोबाईल ऐप द्वारे शेतकऱ्यांना फायदा होईल. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अभिनव उपक्रम तसेच संकल्पनेतून साकारलेल्या ‘ ई पिक पाहणी मोबाईल ऐप’ या महत्वकांक्षी प्रकल्पास सर्वांनी सहकार्य करावे तसेच संबंधित गावातील कृषी सहाययक आणि तलाठी यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांनि आपल्या शेतात पेरणी केलेल्या पिकाची माहिती या मोबाईल ऐप मध्ये डॉउनलोड करून हा प्रकल्प यशस्वी करण्यास मदत करावी असे आव्हान सुद्धा तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले दरम्यान या प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले टाटा ट्रस्ट चे राज्य समन्वयक अशोक लोखंडे आणि मोबाईल ऐप तयार करणारे स्वप्नील जोशी यांनी कामठी तालुक्यातील समस्त तलाठी, कृषी सहाययक, महसूल अधिकारी, कृषी अधिकारी यांना या ई पीक पाहणी मोबाईल ऐप चे प्रोजेकट्टर द्वारे प्रशिक्षण दिले.
यावेळी नायब तहसीलदार गणेश जगदाडे, सहाययक गट विकास अधिकारी सुरेश कोल्हे, तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत, पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी शुभांगी कांमडी, विस्तार अधिकारी शशिकांत डाखोळे यासह तलाठी,कृषि सहाययक, महसूल अधिकारी , तसेच शेतकरी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.
संदीप कांबळे कामठी