Published On : Thu, Jul 18th, 2019

…आणि जंगली कबुतराला मिळाले जीवदान..

Advertisement

माणुसकी चे उदाहरण: ३५ फूट उंचीवर (HT विजेच्या तारेवर) नायलॉन मांजा मध्ये अडकलेल्या जंगली कबुतराची अथक प्रयासानंतर झाली सुटका….

नागपूर: सध्याच्या धावपळीच्या काळात जिथे लोकांना कोणाचा अपघात झाला, रस्त्यावर कोणी जखमी माणूस दिसला तर त्याला दवाखान्यात न्यायला वेळ नाही त्याच्याकडे लक्ष देण्याची मानसिकता नाही आश्यावेळी मूक प्राणी अथवा पक्षी ह्यांना वाचविणे असे उदाहरण फारच कमी मिळतील.

Advertisement

पण नुकताच टेलिकॉम नगर नागपूर येथील दोन सजग युवा नागरिक आणि नागपूर महानगर पालिकेच्या नरेंद्र नगर अग्निशमन विभागाची चमू ह्यांच्या संयुक्त प्रयत्नाने माणुसकी जिवंत आहे ह्याचे उदाहरण समोर आले. झाले असे कि जवळपास ३० /३५ फुट उंचीवर कडू लिंबाचे झाड आणि उंच इमारत (High Tension HT विजेच्या तारेवर) ह्यामध्ये लटकून असलेल्या नायलॉन मांजा मध्ये अडकलेल्या आणि मरण प्राय यातना सहन करणाऱ्या जंगली कबुतराला ३ तासाच्या अथक प्रयत्नानंतर यश आले आणि निष्पाप जीवाला जीवनदान मिळाले.

नायलॉन मांजा मूक पक्ष्यासाठी किती खतरनाक असतो ह्याचे जिवंत उदाहरण काल दिनक जुलै १७, २०१९ ला प्रत्यक्ष पाहायला मिळाले. झाले असे कि टेलिकॉम नगर येथे एक जंगली कबुतर आपल्या त्याच्या घर परतनीच्या वेळी (जवळपास सायंकाळी ५.३०वाजता) जवळपास ३० /३५ फुट उंचीवर कडू लिंबाचे झाड आणि उंच इमारत ह्यामध्ये लटकून असलेल्या नायलॉन मांजा मध्ये अडकले…..जवळपास अर्धा तास कबुतराने त्या मांज्या तून स्वत ला सोडविण्याचा प्रयत्न केला असेल पण त्यामुळे ते माज्यामध्ये अधिकच गुंतत गेले आणि ३५ फुट अधांतरी मरण प्राय वेदना मध्ये लटकून राहिले..

हा सर्व प्रकार त्या मार्गाने येणाऱ्या जाणार्या बर्याच लोकांनी बघितला …त्या कबुतराची तडफड बघितली …पण प्रत्येक जन आपल्यायला काय करायचेय , ते कबुतर मरणारच ह्या भावनेतून निघून गेला.

जेव्हा हि बाब त्याच भागातील राहिवासी सिद्धेश नाजपांडे आणि सचिन द्रवेकर ह्यांना कळली तेव्हा प्रथम दोघांनी मिळून झाडावर चढून, बांबूच्या सहायाने किवा पतंग उडवून ..जंगली कबुतराला त्या मरणप्राय यातनातून सोडविण्याचा प्रथम जवळपास १ तास प्रयत्न करून पहिला. पण कबुतर (High Tension HT विजेच्या तारेवर) असल्यामुळे त्यांनी आणि नंतर महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाला आणि महावितरण च्या कर्मचारी ह्यांना पाचारण केले. कौतुकास्पद बाब म्हणजे महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाची चमू क्षणार्धात पोहोचली

सिद्धेश नाजपांडे आणि सचिन द्रवेकर आणि अग्निशमन विभागाची चमू दत्तात्राय भोकरे, आशु आदमने, सोपान शेंबेकर आणि ऋषिकेश हाडके ह्यांनी जवळपास पुन्हा १ तास विविध उपाय करून बघितले आणि शेवटी “गिरगोट” च्या सह्हायाने कबुतराला ला त्या मरणप्राय यातना मधून सोडविले.

नायलॉन मांजा कबुतराच्या संपूर्ण पंखावर आणि गळ्यावर इवढा गुतला होता कि थोडा वेळ ला असता तर त्याचा गळा चिरला गेला असता. सर्वांनी काबुतारावर प्राथमिक उपचार करून मांजाच्या त्या जीवघेण्या जाळ्यापासून जंगली कबुतराला मुक्त केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement