Published On : Sat, Aug 31st, 2019

अवैध देशीदारू अड्यावर धाड,10 पेटी अवैध देशी दारु जप्त

महिला आरोपीस अटक, 24 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामठी :-नागपूर शहर पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय यांच्या आदेशानव्ये पोळ्याच्या पाश्वरभूमीवर डिसीपी निलोत्पल यांच्या मार्गदर्शनार्थ नवीन कामठी पोलिस स्टेशन परिसरात काल रात्रभर कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले या अभियानातून कामगार नगर येथील एका अवैध दारू विक्री अड्यावर धाड घालण्यात पोलिसांना यशप्राप्त झाले असून या धाडीतून 10 पेटी अवैध देशी दारू किमती 24 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत दारू विक्रेता एका 45 वर्षीय महिला आरोपीवर भादवी कलम 65(ई)अनव्ये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आले असून अटक महिला आरोपीचे नाव राजिया बानो मो असलम रा कामगार नगर कामठी असे आहे.

ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल, पोलीस उपनिरीक्षक विनोद धोंगडे, डी बी स्कॉड चे ज्ञानचंद दुबे, प्रमोद वाघ,मंगेश गिरी, वेदप्रकाश यादव, ललित शेंडे यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी