Published On : Tue, Aug 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

माझ्यावर गोळीबार झाला, लाठीचार्ज…;फडणवीसांनी सांगितला रामजन्मभूमी आंदोलनाचा अनुभव

Advertisement

माझ्यावर गोळीबार झाला, लाठीचार्ज…;फडणवीसांनी सांगितला रामजन्मभूमी आंदोलनाचा अनुभव

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात जेन-झी पिढीतील तरुणांशी संवाद साधत आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रवासातील अनेक आठवणी सांगितल्या. यावेळी त्यांनी रामजन्मभूमी आंदोलनापासून जम्मू-काश्मीरमधील तिरंगा आंदोलनापर्यंतच्या अनुभवांना उजाळा दिला.

फडणवीस यांनी सांगितले की, वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी ते विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनात सहभागी झाले होते. श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याच्या उद्देशाने हजारो तरुण जम्मू-काश्मीरमध्ये गेले होते. सुरक्षा दलांनी आंदोलनकर्त्यांना अडवून ताब्यात घेतले आणि त्यांना दिल्लीला आणण्यात आले, असा अनुभव त्यांनी सांगितला.

1992 मध्ये मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लाल चौकात तिरंगा फडकवण्यात आल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

यानंतर फडणवीस यांनी रामजन्मभूमी आंदोलनातील प्रसंग सांगितले. वयाच्या 20व्या वर्षी प्रयागराजमार्गे अयोध्येत पोहोचलो. त्यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर गोळीबार आणि लाठीचार्जचा सामना करावा लागला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तब्बल 18 दिवस तुरुंगात राहावे लागले, असे फडणवीस यांनी सांगितले.

Advertisement

तुरुंगातून सुटल्यानंतरही आंदोलनात पुन्हा सहभागी झाल्याचे त्यांनी नमूद केले. 1992 मध्ये बाबरी मशीद पाडली गेली, त्यावेळी आपण अयोध्येत उपस्थित होतो आणि त्या घटनेचा आपल्याला अभिमान असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

“राजकारण हा माझा व्यवसाय नसून मिशन आहे. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी राजकारण हे प्रभावी माध्यम आहे,” असे फडणवीस यांनी तरुणांशी संवाद साधताना स्पष्ट केले.

स्टार्टअप्ससाठी स्वतंत्र निधी-
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील स्टार्टअप्स आणि तरुण उद्योजकांबाबतही माहिती दिली. नव्या कल्पना आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र निधीची तरतूद केली असून, स्टार्टअप्सना आवश्यक सहकार्य करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.