नागपूर, ता.२८: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका नागरिकांच्या सोयीसाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. यंदा पारंपरिक कृत्रिम विसर्जन तलावांसोबतच नागरिकांना घरबसल्या गणेश मूर्ती विसर्जित करता याव्यात, याकरिता मनपाने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. मनपाद्वारे शहराच्या दहाही झोनमध्ये एकूण २२ फिरत्या विसर्जन वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते या फिरत्या विसर्जन वाहनाचे गुरुवारी (ता.२८) लोकार्पण करण्यात आले. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित छोटेखानी समारंभात मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांच्यासह धरमपेठ झोनच्या सहायक आयुक्त श्रीमती स्नेहलता कुंभार, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयक्त श्री. सतीश चौधरी, मनपाचे मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेद्वारा श्री गणेशाच्या स्थापनेपासून तर, मूर्ती विसर्जनापर्यंत शहरातील नागरिकांकरिता विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मनपातर्फे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील २१६ ठिकाणी ४१९ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदा मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनाची गोरेवाडा, कोराडी, कच्छीवीसा येथे सोय करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांना घरबसल्या गणेशमूर्ती विसर्जित करता याव्यात याकरिता फिरते विसर्जन वाहनांची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक झोन मध्ये दोन असे एकूण २२ फिरत्या वाहनांची सोय करण्यात आली आहे. याफिरते विसर्जन वाहन हे नागरिकांसाठी सोयीस्कर असून, नागरिकांना थेट घरी बसल्या पर्यावरणपूरक विसर्जन करता येणार आहे.
फोन करा अन् थेट वाहन आपल्या दारी ..
मनपाद्वारे नागरिकांना सोयीस्करपणे गणेशमूर्ती विसर्जन करता येणार आहे. याकरिता मनपाच्या दहाही झोन मध्ये झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. फिरते विसर्जन वाहन दारी बोलाविण्यासाठी नागरिकांना एक दिवसापूर्वी फोन करून गणेश मूर्ती विसर्जनाची तारीख, आपला संपूर्ण पत्ता, गुगल लोकेशन मोबाईल क्रमांक आदी माहिती द्यावयाची आहे.
झोन निहाय भ्रमणध्वनी क्रमांक :
झोन क्र. | झोनल अधिकारी | वाहन चालक | ||
नाव | नंबर | नाव | नंबर | |
1 | ऋषिकेश इंगळे | 8698037047 | गोविंद शाहु | 9922023082 |
सुरज प्रसाद तिवारी | 9075334663 | |||
2 | दिनदयाल टेंबेकर | 9823245671 | विशाल खोंडेकर | 8149787319 |
3 | दिनेश कलोदे | 9823245673 | अमित गजभिये | 8446823237 |
खोब्रागडे | 8788829261 | |||
4 | राजेश गायधने | 9823350242 | अंकित हरीकेन | 8412010212 |
5 | विठोबा रामटेके | 9823313064 | विकास दामनकर | 9595014390 |
6 | सुरेश खरे | 9823313086 | मुकुल बोरकर | 9834893701 |
नरेश बेडसे | 9372299862 | |||
7 | वामन काईलकर | 9823313105 | श्याम वैद्य | 8600360740 |
8 | मंगेश राऊत | 9850342942 | अमोल शिंदे | 9326150616 |
निलेश मेश्राम | 8806719147 | |||
9 | सुनील तांबे | 8766528508 | विनायक चुटेलकर | 7219165922 |
विष्णु खरगयाल | 8766556784 | |||
10 | प्रमोद आत्राम | 9823245679 | विनय मतेलकर | 9307820145 |