Published On : Sun, Aug 15th, 2021

महापौर नेत्र ज्योती अभियानांतर्गत सुरेंद्रगड येथे नेत्र तपासणी शिबिर

महापौरांच्या हस्ते उद्घाटन : सुमारे १५० नागरीकांची तपासणी


नागपूर : महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि महात्मे नेत्रपेढीच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या महापौर नेत्र ज्योती योजनेंतर्गत शनिवारी (ता.१४) धरमपेठ झोन मधील सुरेंद्रगड येथे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.

सुरेंद्रगड मनपा हिंदी विद्यालयात आयोजित शिबिराचे उद्घाटन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते झाले. यावेळी मनपाचे आरोग्य समिती उपसभापती विक्रम ग्वालवंशी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, मनपाचे अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, विनोद कन्हेरे, विनोद सिंह बघेल, नरेश बरडे ,किशन गावंडे, नरेंद्र ठाकुर, योगेश त्रिवेदी, सुरेश चंद गुप्ता, उदय मिश्रा, वैशाली इंगळे, मलिक बंजारा, अनीता फुले, राजेश गौतम, रागिनी बनोदे, पवन प्रजापती, शीतल ताकसांडे, गजानंदजी मारवाडे, चंद्रभान चौधरी, राजेश्वर सिंह, राहुल तुमडाम, विमलेश द्विवेदी, विमलेश वर्मा आदी उपस्थित होते.

शिबिरामध्ये सुमारे १५० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.