Published On : Sun, Aug 15th, 2021

एनएमआरडीए: ‘पीएमएवाय’ घटक क्र.३, उर्वरित २९८० घरकुलांची सोडत, व्हर्चुअल पद्धतीने होणार घरकुल सोडत सोहळा

Advertisement

– महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व ‘नामप्रविप्रा’चे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनिल केदार आणि खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते होणार सोहळयाचे उदघाटन,यु-ट्युब लिंकच्या माध्यमाने व्हा सहभागी, महानगर आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांचे लाभार्थ्यांना आवाहन

नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (नामप्रविप्रा) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी घरकुलांचे बांधकाम करीत आहे. तयार घरकुलांच्या हस्तांतरण प्रक्रिया देखील सुरू आहे. तर आता ‘नामप्रविप्रा’ने तयार केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना घटक क्रमांक ३ अंतर्गत उर्वरित २९८० घरकुलांच्या वाटपासाठी सोडत (लॉटरी) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या सोमवार, दिनांक १६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता यु-ट्यूबवर आभासी प्रणाली द्वारे (व्हर्चुअल पद्धतीने) सोडत पार पडणार असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व ‘नामप्रविप्रा’चे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय परिवहन मंत्री मा. श्री. नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. डॉ. नितीन राऊत, राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री मा. श्री. सुनिल केदार आणि मा. खासदार श्री. कृपाल तुमाने यांच्या हस्ते व्हिडीओ लिंकच्या माध्यमाने संपन्न होणार आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून दूर आणि सावध राहण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी या सोडत सोहळ्यासाठी कुठेही गर्दी करू नये, शासनाच्या दिशा निर्देशानुसार कोरोना महामारी (प्रोटोकॉल) नियमांचे पालन करून नागरीकांनी घरी किंवा कार्य स्थळी राहून https://bit.ly/nmrda2021 या यु-ट्यूब लिंकच्या माध्यमातून सहभागी होण्याचे आवाहन महानगर आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी लाभार्थ्यांना केले आहे.
एकूण ४३४५ घरकुलांपैकी २९८० घरकुले वाटपास उपलब्ध आहेत. याकरिता आतापर्यंत एकूण ३३७० आवेदन प्राप्त झालेले असून सोमवारी या घरकुलांची सोडत काढण्यात येणार आहे. सोहळा संपन्न झाल्यानंतर आवेदकांना आपले नाव या https://pmay.nitnagpur.org वेबसाईटवर पाहता येणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र आणि राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. नामप्रविप्राद्वारे प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) (AHP) घटक क्र. ३ अंतर्गत सन २०१८ पासून बांधकामाला सुरवात करण्यात आली असून प्रकल्पाचे (घरकुलांचे) बांधकाम पुर्ण झालेले आहे. मा. केंद्रीय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सन २०१९ मध्ये दिनांक, १८ ऑगस्ट रोजी एकूण ४३४५ घरकुलांपैकी ४१७२ घरकुलांचे सोडत काढण्यात आली होती. यात ११०२ लाभार्थ्यांनी प्रथम हप्ताची भरणा केला असून त्यापैकी ९१९ लाभार्थ्यांनी पूर्ण रक्कम देय केली व ताबा घेतलेला आहे.
प्रत्येक घरकुलाकरीता केंद्र शासनाचे रू. १.५० लक्ष व राज्य शासनाचे रू. १.०० लक्ष असे एकूण रू. २.५० लक्ष अनुदान.
घरकुलांचा तपशील
ख.क्र. १२/१-२ मौजा वांजरी येथे एकूण ७६५ घरकुलांपैकी ५८३ घरकुले शिल्लक.
ख.क्र. ६२ मौजा तरोडी (खुर्द) येथे एकूण ९४२  घरकुलांपैकी ६६० घरकुले शिल्लक.
ख.क्र. ६३ मौजा तरोडी (खुर्द) येथे एकूण २३७४  घरकुलांपैकी १७३७ घरकुले शिल्लक.
घरकुल योजनेच्या बांधकामांची वैशिष्ट्ये:
घरकुले बांधण्याकरीता (Conventional Technology / Shearwall Technology) चा वापर करण्यात येत असून या घरकुलांमध्ये सभोवतालच्या परिसराच्या विकासाची कामे, कंपाउंड वॉल, योगा सेंटर, नित्योपयोगी वस्तुंचे दुकाने (Convenience Shopping), पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ते, पावसाळी पाणी वाहीका, रेन वॉटर हारवेस्टींग, पार्कीग, मिटर रूम, बाहय विद्युतीकरण, रूफ टॉप सोलर प्लॅन्ट, सौर उर्ज्जेवर चालणारी पथ दिवे, इत्यादी बाबींचा समावेश आहे.
प्रकल्पाच्या सर्व इमारती एकूण ५ मजली (G-4) असून २८.५३ ते ३०.०० चौ.मी. चटई क्षेत्रफळाच्या असून प्रत्येक घरकुलामध्ये लिव्हीग रूम, किचन, बेडरूम, बालकणी, स्वतंत्र संडास व बाथरूमसह सर्व सोईयुक्त परीपुर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.