Published On : Sun, Aug 15th, 2021

गोरेवाडा स्मशानभूमीत एक हजार वृक्षारोपण

ऑक्सिजन झोन अंतर्गत करंजी, पिंपळ, कडू निंबाच्या रोपांची लागवड

नागपूर : नागपूर शहरातील विविध भागात साकारत असलेल्या ऑक्सिजन झोन अंतर्गत शनिवारी (ता. १४) मंगळवारी झोनमधील गोरेवाडा स्मशानभूमीमध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन देणाऱ्या एक हजार रोपट्यांची लागवड करण्यात आली.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी या वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. याप्रसंगी माजी आमदार प्रा. अनिल सोले, ज्येष्ठ नगरसेवक सर्वश्री सुनील अग्रवाल, संदीप जाधव, भूषण शिंगणे, नगरसेविका संगीता गि-हे, अर्चना पाठक, आशिष वानदिले, योगेश बन, संदेश कनोजे, सुधीर कपूर आदींसह मनपाच्या उद्यान विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गोरेवाडा स्मशानभूमीमध्ये ऑक्सिजन झोन साकारण्याचा उद्देशाने या संपूर्ण परिसरात करंजी, पिंपळ, कडू निंब अशा जास्तीत जास्त ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची लागवड करण्यात येत आहे.